AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या हस्ताक्षर सेरिमनीची चर्चा, तुम्हाला महितीये ‘ही’ रीत?

नक्की काय आहे 'हस्ताक्षर सेरिमनी' रीत.. अनंत - राधिका यांनी गणपतीसमोर का केले हस्ताक्षर? फार कमी लोकांना माहिती आहे 'ही' प्रथा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या 'हस्ताक्षर सेरिमनी'ची चर्चा...

अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या हस्ताक्षर सेरिमनीची चर्चा, तुम्हाला महितीये 'ही' रीत?
| Updated on: Mar 06, 2024 | 1:59 PM
Share

मुंबई | 6 मार्च 2024 : अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 1 ते 3 मार्चपर्यंत अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम रंगला. प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अनेक येजना करण्यात आल्या होत्या. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील सर्वात लक्षवेधी ठरणारी एक गोष्ट म्हणजे हस्ताक्षर सेरिमनी… पण हस्ताक्षर सेरिमनी म्हणजे नक्की काय? हे कोणाला अद्याप कळलेलं नाही.

सांगायचं झालं तर, आता प्री – वेडिंगमुळे चर्चेत असलेल्या अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै 2024 मध्ये होणार आहे. तर प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांची हस्ताक्षर सेरिमनी पार पडली. अशा हस्ताक्षर सेरिमनी म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र फक्त आणि फक्त हस्ताक्षर सेरिमनीची चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अनंत अंबानी गणपतीच्या मुर्तीसमोर काही लिहिताना दिसत आहेत. राधिका देखील होणाऱ्या पतीच्या शेजारी उभ्या आहेत आणि पंडित देखील दिसत आहेत. Reddit वर या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. काही गुजराती व्यक्ती म्हणाले, ‘ही रीत प्रत्येकाच्या घरात होत नाही. पण अंबानी कुटुंबाने प्रथेत काही बदल केले आहेत…’

काही नेटकरी म्हणाले, ‘अनंत आणि राधिका यांनी गणपतीसमोर लग्नाच्या पत्रिकेवर हस्ताक्षर केलं आणि गणरायाला पहिलं निमंत्रण दिलं आहे…’ ही प्रथा वर-वधू यांच्या घरात होते. ‘अनंत – राधिका यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा…’ असल्याचं देखील अनेक नेटकरी म्हणत आहेत.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. सांगायचं झालं तर, अंबानी कुटुंबियांच्या कोणत्याही कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी हजर राहतात. अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी देखील बॉलिवूडचे महानाक अमिताभ  बच्चन यांच्यापासून अभिनेत्री जान्हवी कपूर, सारा अली खान यांसारखे सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण