‘मला माझ्या शरीराची किळस येतेय’, करण जोहरने व्यक्त केली वेदना, म्हणाला ‘मी कपड्यांशिवाय आरशात नाही…’
करण जोहर सध्या अशा मानसिक स्थितीतून जात आहे जिथे त्याला स्वतःच्या शरीराकडे पाहून किळस येते. त्याने एका मुलाखतीत सांगितलं तो एका गंभीर आजाराचा सामना करत असून त्याला स्वत:च्या शरीराची लाज वाटते.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर सध्या त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने ज्यापद्धतीने त्याचे वजन कमी केले आहेत त्यावरून त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे. वजन कमी केल्यानंतर त्याचा लूकच बदलला असून तो एखाद्या आजारी रुग्णासारखा दिसत असल्याचं त्याला म्हटलं जात आहे.
करण जोहरने केलं स्वत:बद्दलच धक्कादायक वक्तव्य
तर याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी म्हटले की, करण जोहरने ड्रग्जच्या मदतीने वजन कमी केले आहे. आता करण जोहरने त्याच्या वजनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच, त्याने हेही सांगितले आहे की तो सध्या कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहे. एवढंच नाही तर त्याने स्वत:च्या शरीराबद्दल असं एक वक्तव्य केलं आहे कि ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ते म्हणजे तो म्हणाला की त्याला त्याच्या शरीराकडे पाहून लाज वाटते.
करण जोहरला त्याच्या शरीराकडे पाहून किळस येते
एका मुलाखतीत करण जोहरने त्याच्या शरीराबद्दल आणि त्याच्या वजनाबद्दल उल्लेख करत म्हणाला की, “मला बॉडी डिसमॉर्फिया आहे. ही अशी स्थिती आहे जिथे तुम्ही कपड्यांशिवाय स्वतःला आरशात पाहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराची लाज वाटते आणि कपड्यांशिवाय तुम्हाला अस्वस्थ वाटते तेव्हा असे होते. मला अजूनही माझ्या शरीराकडे पाहून किळस वाटते, लाज वाटते”
View this post on Instagram
करणने सांगितले की बॉडी डिसमॉर्फिया म्हणजे काय?
जेव्हा करण जोहरला त्याच्या शरीराबद्दल थोडे अस्वस्थ वाटणे आणि बॉडी डिसमॉर्फिया यातील फरक विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला अस्वस्थ वाटते. त्यात तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल किळस वाटत नाही. ते म्हणजे बॉडी डिसमॉर्फिया. पण मला किळस वाटते. मी स्वतःला कपड्यांशिवाय पाहूही शकत नाही. आता मात्र ते वाटणं हळू हळू कमी होत आहे. पण अजूनही ते पूर्णपणे ठीक नाही.” करण पुढे म्हणाला की, तो त्याच्या शरीराला लपवण्यासाठी त्याच्या आकारापेक्षा मोठे कपडे घालायचा, कारण त्याला त्याच्या शरीराकडे पाहून लाज वाटत असे.
View this post on Instagram
करण जोहरने त्याच्या वजनाबद्दल काय म्हटले?
त्याच वेळी, करण जोहरने त्याच्या कमी वजनाबद्दल सांगितले. करण जोहर म्हणाला, “मी नेहमीच लठ्ठपणाशी झुंजत आलो आहे. मी हजारो वेगवेगळे आहार घेतले, वेगवेगळे व्यायाम केले, जे काही उपलब्ध होते ते सर्व काही वापरून पाहिले. अनेक वर्षांनंतर, मी स्वतःची तपासणी केली आणि मला कळले की मला थायरॉईडसह इतर काही समस्या आहेत ज्या मला नीट करायच्या आहेत आणि मी आता त्या नीट करण्यासाठी काम करत आहे.”
करण जोहर पुढे म्हणाला की त्यानंतर त्याने OMAD डाएट बंद केला. तथापि, नंतरही त्याने लैक्टोज, ग्लूटेन आणि साखरेपासून स्वत:ला दूर ठेवले. करण म्हणाला, “अलिकडच्या काही महिन्यांत मी वेट ट्रेनिंग आणि पॅडल चालवण्यास सुरुवात केली आहे कारण मला जाणवले की आता मला वजन वाढवणे आवश्यक आहे.”
