‘BIGG BOSS’ या नावात ‘G’एक्स्ट्रा का लावतात? या मागे आहे ज्योतिष शास्त्र? जाणून घ्या खरं कारण
बिग बॉस 19 हा शो आता हळू हळू फुलत चालला आहे. शोमधील स्पर्धकांचा प्रवास, खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत, पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं का की 'BIGG BOSS' या नावात 'G'एक्स्ट्रा लावण्यात आला आहे. पण तो का? त्यामागे खरंच काही ज्योतिषीय कारण आहे का जाणून घेऊयात.

बिग बॉसचा प्रत्येक सीझन आपापल्या पद्धतीने खास राहिला आहे. आता बिग बॉसचा 19 वाज सीझन कशापद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक स्पर्धक आपापल्या वेगवेगळ्या शैलीत वावरताना सध्या तरी दिसत आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये किती ट्वीस्ट अन् टर्न पाहायाला मिळतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.
BIGG BOSS’ या नावात ‘G’एक्स्ट्रा का लावतात?
दरम्यान अनकेांच्या ही गोष्टी लक्षात आली आहे का की ‘BIGG BOSS’ या नावात ‘G’एक्स्ट्रा का लावतात? यामागे फक्त नावाचं आकर्षण हे कारण आहे की ज्योतिष शास्त्राचं कारण आहे. हे बऱ्याच जणांना माहित नसेल चला जाणून घेऊयात यामागिल खरं कारण.
पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये मिळालं उत्तर
बिग बॉसच्या सीझन 13 मधील एक स्पर्धक सर्वांनाच माहित आहे तो म्हणजे पारस छाब्रा. पारसने बिग बॉसमध्ये नक्कीच आपली एक खास ओळख निर्माण केली. त्याने या शोनंतर, पारस छाब्राने ‘आबरा का डाबरा शो’ नावाचा स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला आहे, ज्यामध्ये तो विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद साधतो.
खगोलशास्त्र आणि अंकशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण
अलिकडेच या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पारस खगोलशास्त्र आणि अंकशास्त्र तज्ज्ञ संजय बी. जुमानी यांच्याशी बोलत आहे. या संभाषणादरम्यान संजय जुमानी यांनी बिग बॉसशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी शेअर केल्या, त्यापैकी एक म्हणजे ‘BIGG BOSS’ या नावात ‘G’एक्स्ट्रा का जोडण्यात आला आहे. बिग बॉसच्या नावात अतिरिक्त ‘G’ जोडण्यामागे ज्योतिषीय कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
म्हणूनच एकस्ट्रा ‘G’ जोडण्यात आला आहे
पॉडकास्टमध्ये संभाषणा दरम्यान पारस संजय बी. जुमानी यांना सांगतो की बिग बॉसचे नावही बदलले आहे. “प्रत्यक्षात ते बिग बॉस असायला हवे होते, पण ते शैतानचा नंबर मानलो जातो. हे खरं आहे का?” पारसच्या विधानाला उत्तर देताना संजय म्हणाले की “आम्हीच शोच्या निर्मात्याला शोच्या नावात एक अतिरिक्त ‘G’ जोडण्यास सांगितले होते, ज्यामुळे 24 हा नंबर मिळेल. 24 हा नंबर शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो लक्झरी, पैसा आणि प्रसिद्धी आकर्षित करतो. तर जर आपण आता बिग बॉस नावाची एकूण संख्या मोजली तर ती 21 येते.”
View this post on Instagram
ज्योतिषीय कारणे काय आहेत?
नाम ज्योतिष हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग मानला जातो, ज्यामध्ये प्रत्येक अक्षर एका संख्येशी संबंधित असते. आणि संख्या ग्रहांशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, A, I, Q, J, Y मध्ये 1 क्रमांक असतो. तर B, K, R मध्ये 2 असतो, C, G, S, L मध्ये असतो 3, तर, D, M, T मध्ये 4 असतो.. तसेच E, H, N, X मध्ये 5 हा क्रमांक असतो. U, V, W मध्ये 6, असतो तर, O, Z मध्ये 7 आणि F, P मध्ये 8 क्रमांक असतात.
अशा परिस्थितीत, जेव्हा आपण बिग बॉसच्या अक्षरानुसार संख्या जोडतो (2+1+3 + 2+7+3+3 = 21), तेव्हा टोटल 21 बेरीज येते. परिणाम 3 येतो. क्रमांक 3 चा स्वामी गुरु म्हणजेच देवगुरू बृहस्पति आहे, जो शिक्षण, ज्ञान, नशीब, संपत्ती, मुले, विवाह, धर्म, करिअर, संपत्ती, दान आणि पुण्य देणारा आहे. त्याच वेळी, जर एक्स्ट्रा G लावल्यानुसार बिग बॉसच्या अक्षराच्या संख्या मोजली तर ती (+1+3+3 + 2+7+3+3 = 24) यते तर परिणाम 6 अंक मिळतो. क्रमांक 6 चा स्वामी शुक्र आहे, जो प्रेम, सौंदर्य, आकर्षण, आनंद, संपत्ती आणि कला देणारा आहे. शुक्राच्या कृपेने, व्यक्तीला समाजात यश आणि प्रसिद्धी मिळते. तसेच, ही संख्या विलासिता, पैसा आणि प्रसिद्धी आकर्षित करते.
बिग बॉस शो हा नक्कीच पैसा, आकर्षण आणि टीआरपीचा आहे त्यामुळे कदाचित ज्योतिषीय कारणामुळे ‘BIGG BOSS’ या नावात ‘G’एक्स्ट्रा लावण्यात आला आहे. पारस छाब्राच्या पॉडकास्टमधील संजय जुमानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करून, या लेखात असे स्पष्ट केले आहे की, नावातील संख्याशास्त्र आणि त्याचे ग्रहांशी असलेले संबंध बिग बॉस शोला यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त ‘G’ जोडण्यात आले होते.
