नीतू कपूर- बबिता यांच्यातील अबोल्याचं कारण काय? कपूर कुटुंबातील सुनांमध्ये मतभेद, पॅचअप कोणी केलं ?

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध कुटुंब. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर , करीना करिश्मा आणि आता रणबीर कपूरपर्यंत या घराण्यातील अनेक पिढ्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. कपूर कुटंबातील सर्वच सदस्य काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्याप्रमाणेच कपूर कुटुंबातील सुना बबीता आणि नीतू कपूर याही मनोरंजन सृष्टीतीलच असून एकेकाळी त्यांनीही मोठा पडदा गाजवला.

नीतू कपूर- बबिता यांच्यातील अबोल्याचं कारण काय? कपूर कुटुंबातील सुनांमध्ये मतभेद, पॅचअप कोणी केलं ?
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 12:41 PM

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध कुटुंब. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर , करीना करिश्मा आणि आता रणबीर कपूरपर्यंत या घराण्यातील अनेक पिढ्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. कपूर कुटंबातील सर्वच सदस्य काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्याप्रमाणेच कपूर कुटुंबातील सुना बबीता आणि नीतू कपूर याही मनोरंजन सृष्टीतीलच असून एकेकाळी त्यांनीही मोठा पडदा गाजवला. पण बबीता आणि नीतू कपूर यांच्या मध्ये एकेकाळी अबोला होता, कित्येक वर्ष त्या एकमेकींशी बोलल्याच नव्हत्या. का ? चला जाणून घेऊया.

अभिनेते रणधीर कपूर यांची पत्नी बबीता आणि ऋषि कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांचं नातं काही खास नव्हता. एकाच कुटुंबातील सुना असूनही त्या एकमेकींशी बराच काळ बोलल्या नाहीत. त्याचं कारण माहीत आहे का ? खरंतर लग्न होऊन कपूर कुटुंबात येण्यापूर्वी बबिता आणि नीतू सिंग या दोघीही नामवंत अभिनेत्री होत्या. मात्र लग्न करून कपूर कुटुंबाची सून बनल्यानंतर दोघींनी अभिनय सोडला आणि घर सांभाळत होत्या. पण तरीही कित्येक वर्ष त्यांचं नातं ठीक नव्हतं. बऱ्याच वर्षांच्या मतभेदांनंतर अखेर बबिता यांची छोटी लेक करीना हिने तिची आई आणि काकू या दोघींच मनोमिलन घडवू आणलं.

ऋषी कपूरच्या लग्नानंतर झाले मतभेद

बबिता कपूर या अतिशय शांत स्वभावाच्या आहेत. कपूर कुटुंबातील त्या एकमेव सदस्य आहेत ज्यांचे नाव कधीही कोणत्याही वादात सापडले नव्हते. पण रिपोर्ट्सनुसार, बबिता आणि नीतू कपूर यांच्यात भांडण सुरू झाले जेव्हा नीतूने ऋषी कपूरशी लग्न केले आणि ती कपूर कुटुंबाची सून म्हणून घरी आली.

करिश्माच्या लग्नात नव्हती आल्या नाहीत नीतू कपूर

1980 मध्ये ऋषी कपूर यांनी त्यांची लेडी लव्ह अभिनेत्री नीतू सिंहसोबत लग्न केले होते. बबिता आणि नीतू यांच्यात पूर्वी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे. अशा स्थितीत दोघीही एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागल्या आणि त्यांच्यातील मतभेद वाढले. ते इतके टोकाला गेले की जेव्हा 2003 साली बबिता आणि रणधीर कपूर मोठी मुलगी करिश्मा कपूरचे संजय कपूरसोबत लग्न झाले तेव्हाही हे मतभेद उघडपणे दिसले.

कारण नीतू कपूर या करिश्मा कपूरच्या लग्नाला आल्याच नाहीत. त्यानंतर जेव्हा ऋषि कपूर आणि नीतू कपूर याची लेक रिद्धिमा कपूर हिचं लग्न झालं, तेव्हा त्या लग्नासाठी बबिताही गेल्या नाहीत. एवढंच नव्हे तर करिश्मा आणि करीना देखील त्यांच्या बहिणीच्या , रिद्धीमाच्या लग्नाला उपस्थित राहिल्या नाहीत.

करीनाच्या लग्नात झाले मतभेद दूर

हे एवढ्यावरचं थांबल नाही. जेव्हा नीतू कपूर यांच्या आईचं निधन झालं तेव्हा त्यांना खंबीरपणे साथ द्यायला संपूर्ण कपूर कुटुंब तिकडे होतं, पण बबिता आणि त्यांच्या दोन्ही मुली त्यावेळी देखील तिथे गेल्या नाहीत. अखेर बऱ्याच वर्षांनी करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नादरम्यान त्यांचे मदभेद दूर झाले. तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसलं.

बबिता यांनी नीतू कपूरला स्वत: दिले निमंत्रण

करीनाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी बबिता या स्वतः ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या घरी गेल्याचे सांगितले जाते. करीना कपूरमुळे तिची आई आणि काकू यांच्यातील अंतर थोडे का होईना कमी झालं असंही म्हटलं जातं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.