रणबीर कपूरची ‘ही’ अभिनेत्री चित्रपटांमध्ये अजिबात मेकअप करत नाही; तरीही प्रेक्षकांच्या मनावर करते राज्य
चित्रपटांमध्ये अभिनेत्रींसाठी मेकअप किंवा हेअरस्टाईल किती महत्त्वाची असते हे सर्वांनाच माहित आहे पण एक अशी अभिनेत्री आहे जी चित्रपटांमध्ये मेकअपच करत नाही. तरीही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तसेत ती आता रणबीर कपूरसोबत काम करत असून लवकरच एका बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार आहेत, ज्यांना त्यांच्या खास त्यांच्या शैलीसाठी ओळखलं जातं. त्यापैकी एक आहे साउथची अभिनेत्री जी आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करतेय. मुख्य म्हणजे ती रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या अभिनेत्रीची एक खास गोष्ट आहे जी फिल्म इंडस्ट्रीमध्येही चर्चेत असते. शिवाय यासाठी तिचं कौतुकही केलं जातं. ते म्हणजे ही अभिनेत्री कोणत्याही चित्रपटात अजिबात मेकअप करत नाही.
साध्या राहणीतून प्रेक्षकांची कायमच मन जिंकते
ही अभिनेत्री आहे साई पल्लवी. जी प्रत्येक वेळेला चित्रपटातून प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते. साई पल्लवीची साउथमध्ये एक खास ओळख आहे.तसेच ती तिच्या अभिनयातून आणि साध्या राहणीतून प्रेक्षकांची कायमच मन जिंकत असते. आता ती हिंदी चित्रपटामध्येही दिसणार आहे. साई पल्लवी रणबीर कपूरसोबत रामायण चित्रपटात काम करत आहे, ज्यामध्ये ती सीता मातेची भूमिका साकारत आहे. तथापि, साई पल्लवीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती चित्रपटांमध्ये मेकअप करत नाही.
View this post on Instagram
“मी माझ्या नैसर्गिक लूकमध्ये जास्त आवडते”
मेकअप, हेअरस्टाईल, हे सर्व चित्रपटांमध्ये खूप महत्वाचे मानले जाते, परंतु साई पल्लवीच्या बाबतीत असे नाही. तिने असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यात तिचा नैसर्गिक लूक आहे, तिने कोणताही मेकअप केलेला नाही. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीला याबद्दल विचारण्यातही आलं होतं. यावेळी तिने याचा खुलासाही केला, तिने सांगितलं की, “तिने कधी मेकअप केलेला नाही असे नाही. त्याऐवजी, चित्रपटांच्या लूक टेस्ट दरम्यान, चित्रपट निर्माते त्यांच्या लूकसह वेगवेगळे प्रयोगही करत असतात. त्यामुळे दिग्दर्शक माझा मेकअप करायला सांगतात, मला लेन्स लावायलाही सांगतात, पण त्यांना मी माझ्या नैसर्गिक लूकमध्ये जास्त आवडते.चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “चित्रपटादरम्यान मेकअप केल्याने अनेकांना आत्मविश्वास वाटतो, पण मला मेकअपशिवाय जास्त आत्मविश्वास वाटतो.”
चित्रपट पात्रावर अवलंबून असतो…
साई पल्लवी मेकअपबद्दल पुढे म्हणाली की “चित्रपटांमध्ये पूर्णपणे पोशाख आणि केशरचना इतक्या महत्त्वाच्या नसतात, जरी त्यांचा रोलही चित्रपटात महत्त्वाचा असतो. पण तुमचे पात्र कसे लिहिले आहे हे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही चित्रपटानुसार मेकअप करणे गरजेचं असतं पण तुमच्या पात्र सर्वात जास्त महत्त्वातं असतं . जर तुमचे पात्र चांगले लिहिले असेल तर तुम्ही चित्रपटात उठून दिसता आणि तुम्हाला वेगवेगळ्या भावनांसह काम करण्याची संधी मिळते ज्यामुळे तुम्ही एक वेगळी व्यक्ती म्हणून प्रेक्षकांना दिसता.” असं म्हणत साईने मेकअप न करण्यामागचं कारण अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे.
