Video: भर कार्यक्रमात अभिनेत्याने गायिकेला केला किस करण्याचा प्रयत्न, पुढे जे झाले ते पाहून नेटकरी संतापले
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमात अभिनेता गायिकेला किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

संपूर्ण जगभरात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी लाइव्ह कॉन्सर्ट होताना दिसत आहेत. या कार्यक्रमांना लाखो लोक हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच आजकाल पुरस्कार सोहळे देखील थाटामाटात पार पडत असल्याचे दिसत आहेत. नुकताच अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि फिल्म प्रोड्यूसर विल स्मिथने अशाच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने गायिकेला किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करून विलला चांगलेच सुनावताना दिसत आहेत.
नुकताच मियामी येथे एक पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पॉप सिंगर इंडिया मार्टिनेजला परफॉर्म करत असताना किस करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विल स्मिथ आणि इंडिया मार्टिनेज पुरस्कार सोहळ्यात गाणे गातागाता एकमेकांच्या फार जवळ आले होते. जवळ आल्यानंतर विलने इंडिया मार्टिनेजला किस करण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यात ती पुढे निघून गेली. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिला तेव्हा त्यांनी ट्रोल विलला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ ‘Premio Lo Nuestro’ पुरस्कार सोहळ्याचा आहे. स्टेजवर स्पॅनिश सिंगर इंडिया मार्टिनेज आणि हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ उपस्थित होते. दोघेही ‘फर्स्ट लव’ हे गाणे परफॉर्म करताना दिसत होते. गाणे गात असताना दोघे एकमेकांच्या एकदम जवळ आहे. त्यांना पाहून ते किस करणार असल्याचे सर्वांना वाटले होते. पण विल किस करायला जवळ येताच इंडिया मार्टिनेज तेथून पुढे गेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
यापूर्वी २०२२ साली विल वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे वितरण सुरु असताना सोहळ्याचा सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. तेव्हा देखील विलला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
