‘या’ 70 वर्षीय महिलेकडून सेलिब्रिटीच नाही तर, राजकीय मंडळी देखील पिझ्झा करतात ऑर्डर
Woman Entrepreneur : 'या' 70 वर्षीय महिलेने कुटुंबियांसाठी बनवलेला पिझ्झा झालाय अनेकांच्या आवडीचा... सेलिब्रिटीच नाही तर, राजकीय मंडळी देखील पिझ्झा करतात ऑर्डर... सध्या सर्वत्र महिलेची आणि महिलेच्या व्यवसायाची चर्चा...

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड अनेकांना असते. आता एकच पदार्थ वेगवेगळ्या प्रकरात बनवला जातो… कित्येक जण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये ठरावीक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जातात. अशाच प्रकारे अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्यानंतर एका 70 वर्षीय महिलेने तयार केलेल्या पिझ्झाचीच निवड करतात. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिभा कनोई (Pratibha Kanoi) आहेत. 70 वर्षीय प्रतिभा फूड किचन (Mummy’s Kitchen) हा उद्योग सांभाळत आहेत. मुंबईमध्ये त्यांचं continental food प्रचंड प्रसिद्ध आहे.
सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांसारखे अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी फूड किचन (Mummy’s Kitchen) येथून पिझ्झा ऑर्डर करतात. कायम घर कामांमध्ये व्यस्त असलेल्या प्रतिभा कनोई यांनी त्यांची स्वयंपाकाची आवड जपली आणि Mummy’s फूड किचन नावाने व्यवसाय सुरु केला.
View this post on Instagram
मुंबईत राहणाऱ्या 4 मुलांची आजी असलेल्या प्रतिभा यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. पण त्याच्या घरी बनवलेले पिझ्झा शहरातील लोकांना एवढ्या आवडतील असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. पण प्रतिभा म्हणतात, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आपण फार काळ लपवून ठेवता येत नाही.
प्रतिभा यांनी कोरोना काळात कुटुंबासाठी बनवलेला पिझ्झा आज अनेकांच्या आवडीचा झाला आहे. सांगायचं झालं तर, कोरोना काळात सर्व काही बंद झालं होतं. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खायची इच्छा असूनही काही मिळत नव्हतं. अशात. आपल्या मुलांची आणि नातवंडांची जंक फूडची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रतिभा यांनी घरी पिझ्झा बनवण्यास सुरुवात केली.
प्रतिभा यांनी तयार केलेला पिझ्झा कुटुंबियांना प्रचंड आवडला आणि कुटुंबियांनी प्रतिभा यांना व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 2020 मध्ये Mommy’s Kitchen ची स्थापना झाली. दिवसागणित प्रतिभा यांनी तयार केलेल्या पिझ्झाची मागणी वाढू लागली. ऑर्डर वाढत असल्यामुळे प्रतिभा यांनी स्वतःची टीम तयार केली. आज Mommy’s Kitchen पिझ्झा प्रेमींसाठी अत्यंत खास आहे.
