जगातील सर्वात भीतीदायक गाणं, लोक ऐकायला घाबरतात, ऐकताना अंगावर येतो कांटा
ज्या गाण्याने लोकांना प्रेम करायला शिकवलं तेच गाणं आता जगातील सर्वात भीतीदायक गाणं बनलं आहे. नेमकं काय घडलं? हे गाणं तुमच्या जबाबदारीवर ऐका.

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी इतकी चर्चेत आली की ती एका रात्रीत सुपरहिट झाली. यामध्ये काही गाणी ही प्रेमावर होती जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे प्रेमाबद्दल होते आणि ते प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडले. मात्र, काही काळानंतर लोक हे गाणं ऐकायला लागले की त्यांना भीती वाटू लागली. कोणते आहे ते गाणं? पाहूयात सविस्तर
दरम्यान, काळानुसार केवळ गाण्याची मांडणी नाही तर त्याचा अर्थ देखील बदलत जातो. काही गाणी अशी असतात की, ती एकटी ऐकली तर मनाला शांतता देतात पण तीच धून जेव्हा एखाद्या भयावह सीनवर वाजते तेव्हा अंगावर काटा येतो. म्हणूनच अनेक चित्रपट दिग्दर्शक हॉरर जॉनरमध्ये निष्पाप, गोड आणि जुन्या गाण्यांचा वापर फार प्रभावी मानतात.
असंच एक गाणं आहे जे कधीकाळी जगातील सर्वात गोड गाणं म्हणून ओळखलं जायचं पण आज तेच गाणं जगातील सर्वात भीतीदायक गाण्यांपैकी एक मानलं जातं आहे.
1926 मध्ये लिहिलं गेलं होतं हे गाणं
या गाण्याची रचना 1926 मध्ये झाली होती. गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार बिली रोज यांनी लिहिले होते तर त्याला संगीत दिले होते ली डेव्हिड यांनी. सुरुवातीला हे गाणं इर्विंग कौफमन यांनी रेकॉर्ड केलं होतं. मात्र, 1927 मध्ये जीन ऑस्टिन यांच्या आवाजात हे गाणं प्रसिद्ध झालं आणि प्रचंड लोकप्रिय ठरलं.
पुढील अनेक दशकांपर्यंत हे गाणं प्रेम, निरागसता आणि रोमँटिक भावनांचं प्रतीक बनून राहिलं. 1950 च्या दशकात फ्रँकी लेन यांच्या आवृत्तीने आणि त्यानंतर पॅशन अँड प्रुडन्स यांच्या व्हर्जनने हे गाणं चार्टबस्टर ठरलं. 1970 आणि 1980 च्या दशकातही अनेक कलाकारांनी या गाण्याला नव्या शैलीत सादर केलं. काळ बदलला, संगीत बदललं.
हॉरर चित्रपटांनी बदलला गाण्याचा अर्थ
या गाण्याला खरे वळण तेव्हा आले, जेव्हा ते हॉरर चित्रपटांमध्ये आणि भीतीदायक दृश्यांमध्ये वापरलं जाऊ लागलं. गाण्याचे गोड शब्द, हळुवार धून आणि त्यासोबत भयावह सीन या विरोधाभासाने प्रेक्षकांवर जबरदस्त परिणाम केला.
जे गाणं कधीकाळी प्रेमाची भावना जागवायचं तेच गाणं आता अस्वस्थता, तणाव आणि भीती निर्माण करू लागलं. अनेक हॉरर चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये या गाण्याचा वापर इतका प्रभावी ठरला की, लोकांच्या मनात या गाण्याची प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली.
