AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आरोप, नाव जाणून व्हाल थक्क

सलमान खानच्या मेहुण्यासोबत 'या' अभिनेत्रीचं 4 वर्षांचं रिलेशनशिप, भाईजानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा अभिनेत्रीवर आरोप... आता 'ती' पतीसोबत जगतेय आनंदी आयुष्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या मेहुण्याच्या खासगी आयुष्याची चर्चा... लवकरच अडकणार दुसऱ्यांदा विवाहबंधनात...

सलमान खानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीवर आरोप, नाव जाणून व्हाल थक्क
| Updated on: Mar 08, 2024 | 2:09 PM
Share

मुंबई | 8 मार्च 2024 : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या कुटुंबासाठी मोठे निर्णय घेताना दिसतो. शिवाय अभिनेत्याने आतापर्यंत कुटुंबातील अनेकांची करियरमध्ये देखील मदत केली आहे. सलमान खान त्याच्या चाहत्यांसोबतच कुटुंबियांची देखील काळजी करताना दिसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलमान खान त्याच्या बहिणींवर प्रचंड प्रेम करतो. अर्पिता तर कायम मोठा भाऊ सलमान खान याच्यासोबत असते. पण सलमान खान याला एका बहिणीचा संसार वाचवता आला आहे. सलमान खान याने मानलेल्या बहिणीचं मोठ्या थाटात लग्न लावून दिल पण, तिचं लग्न एक वर्ष देखील टिकलं नाही.

सध्या सलमान खान याच्या ज्या बहिणीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, श्वेता रोहिरा आहे. श्वेताचं लग्न अभिनेता पुलकित सम्राट याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. आता पुलकित अभिनेत्री कृती खरबंदा हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पुलकित आणि कृती लग्न करणार आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा पुलकित याचं नाव अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत जोडण्यात आलं. पुलकित आणि यामी यांनी ‘सनम रे’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. तेव्हाच दोघांमध्ये प्रेम बहरलं असं देखील सांगण्यात आलं.

यामीला डेट करण्याआधी पुलकित विवाहित होता. पुलकित याने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता हिच्यासोबत लग्न केलं होतं. श्वेतासोबत घटस्फोट झाल्यानंतर पुलकित याच्या आयुष्यात यामी हिची एन्ट्री झाली. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीवर सलमान खानच्या बहिणीचा संसार मोडल्याचे आरोप देखील लावण्यात आले.

रिपोर्टनुसार, पुलकित – यामी यांनी 2015-16 मध्ये डेट करायला सुरुवात केली. पण 2018 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, यामी हिने पुलकितवर वाईट प्रकारे वागणूक केल्याचे आरोप लावले होते. अशात दोघांमध्ये अनेक वाद झाले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

यामीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने निर्माता आदित्य धर याच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण