‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील मुख्य कलाकारांना रातोरात दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं?

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या मुख्य कलाकारांना तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अरमान आणि रुहीची भूमिका साकारणारे कलाकार आता या मालिकेत दिसणार नाहीत. यामागचं नेमकं कारण काय, ते वाचा..

'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील मुख्य कलाकारांना रातोरात दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं?
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील मुख्य कलाकारांची एग्झिटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 11:47 AM

मुंबई : 19 मार्च 2024 | स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’बद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मालिकेत अरमान पोद्दार आणि रुही बिर्ला या मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शहजादा धामी आणि प्रतीश्रा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत दोन नवे कलाकार दिसणार आहेत. नुकताच या मालिकेत जनरेशन लीप आला होता. त्यानंतर मुख्य भूमिकांसाठी शहजादा आणि प्रतीक्षा यांची निवड करण्यात आली होती. तर या मालिकेत अभीराची भूमिका समृद्धी शुक्ला साकारतेय. आता शहजादा आणि प्रतीक्षा यांना मालिकेतून अचानक काढून टाकण्याचं कारण समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. या दोघांमधील जवळीक वाढली होती आणि त्याचा परिणाम मालिकेच्या कामावर होऊ लागला होता. सेटवरील त्यांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे आधी क्रिएटीव्ह टीमशी वाद झाला. नंतर हा मुद्दा थेट प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचला. आता प्रॉडक्शन हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोघांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शहजादा हा शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून वेळा आणि इतर नियमांचं पालन करत नव्हता. सेटवर त्याचे सतत ट्रँट्रम्स असायचे आणि क्रू मेंबर्सनाही तो अपमानास्पद वागणूक द्यायचा. दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन हाऊसकडून अनेकदा इशारा देऊनही त्याच्या वागणुकीत काही बदल झाला नाही. तर दुसरीकडे प्रतीक्षा ही नवोदित अभिनेत्री आहे. मात्र तिच्या अभिनयात फारसा दम नसल्याने दोघांचाही करार रद्द करण्यात आला आहे.

या मालिकेचं शूटिंग सुरू असताना निर्माते राजन शाही स्वत: सेटवर आले आणि त्यांनी शहजादा-प्रतीक्षाला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला, असंही कळतंय. राजन शाही यांनी स्टार प्लस वाहिनीवर आजवर अनेक हिट मालिका दिल्या आहेत. त्यामुळे मालिकेपेक्षा मोठं कोणंच नाही, या नियमाचं पालन करत त्यांनी दोन्ही कलाकारांना बाहेरचा रस्ता दाखवला.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत आता गर्विता सधवानी रुहीची भूमिका साकारणार आहे. तर रोहित पुरोहितने शहजादाची जागा घेतली आहे. गर्विताने याआधी ‘बातें कुछ अनकहीं सी’ या मालिकेत मृणालची भूमिका साकारली होती. तर श्वेता तिवारीच्या ‘मैं हूँ अपराजिता’मध्ये ती नियाच्या भूमिकेत होती. आता अरमान आणि रुहीच्या भूमिकेत हे नवीन कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.