अरमान मलिक पाचव्यांदा बनणार पिता? बेबी शॉवर पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!

युट्यूबर अरमान मलिक अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. दोन लग्नांमुळे तो प्रकाशझोतात आला. आपल्या दोन्ही पत्नी आणि मुलांसोबत तो एकाच घरात एकत्र राहतो. या आठवी नापास युट्यूबरची तब्बल 200 कोटींची संपत्ती आहे.

अरमान मलिक पाचव्यांदा बनणार पिता? बेबी शॉवर पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!
Youtuber Armaan Malik with his familyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 1:46 PM

युट्यूबर अरमान मलिक हे सोशल मीडियावरील चर्चेतलं नाव आहे. अरमान हा त्याच्या दोन लग्नांमुळे प्रकाशझोतात आला होता. कृतिका मलिक आणि पायल या दोन्ही पत्नींसोबत तो एकाच घरात राहतो. इतकंच नव्हे तर अरमानच्या दोन्ही पत्नींचाही सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. हे तिघं मिळून युट्यूबवर त्यांच्या खासगी आयुष्याविषयीचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्याला चाहत्यांकडूनही पसंती मिळते. याच युट्यूबच्या माध्यमातून अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी भरभक्कम कमाई करतात. नुकतेच सोशल मीडियावर अरमानच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर त्याने तिसऱ्यांदा लग्न केल्याची चर्चा रंगली होती. आता लग्नाच्या चर्चा ताज्या असतानाच बेबी शॉवरचेही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

अरमान मलिक पुन्हा एकदा पिता होणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र अरमानची कोणती पत्नी पुन्हा गरोदर आहे, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. आपल्या नव्या व्लॉगमध्ये अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बेबी शॉवर साजरा करताना दिसतोय. पायल मलिकने हा व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये पायल आणि कृतिका एका ठिकाणी पोहोचतात, जिथे बेबी शॉवरची सजावट करण्यात आली आहे. यानंतर पायल म्हणते की, “आम्ही बेबी शॉवरला आलो आहोत. आता तुम्हाला याचा अंदाज लावायचा आहे की हे बेबी शॉवर कोणाचं आहे? गोलूचं की माझं?” या व्लॉगमध्ये पायल एक केकसुद्धा दाखवते. त्यावर ‘डॅड’ असं लिहिलेलं असतं. पायल आणि कृतिका या दोघींपैकी नक्की कोण गरोदर आहे, हे पुढच्या व्लॉगमध्ये स्पष्ट होईल. मात्र अरमान पाचव्यांदा पिता बनणार आहे, हे खरं असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

हा व्लॉग पाहिल्यानंतर काहींनी असाही अंदाज वर्तवला आहे की हे एखाद्या गाण्याचं शूटिंग असू शकतं. कारण याच व्लॉगमध्ये पुढे दाखवलंय की अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत डान्स करतोय आणि कोरिओग्राफर त्यांना स्टेप्स शिकवतोय. अरमानची लोकप्रियता पाहून ‘बिग बॉस ओटीटी 3’कडून त्याला ऑफर मिळाल्याचीही चर्चा आहे. अरमानने पायलशी पहिलं लग्न केलं आणि त्यानंतर तिचीच मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. या दोघींसोबत अरमान एकाच घरात राहतो. पायलकडून अरमानला तीन मुलं आणि कृतिकाकडून एक मुलगा आहे. गेल्या वर्षी दोघी एकत्र गरोदर होत्या. त्यावेळी पायलने जुळ्या मुलांना आणि कृतिकाने एका मुलाला जन्म दिला होता.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.