AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush: युट्यूबरने रिक्रिएट केला ‘आदिपुरुष’चा अंडरवॉटर सीन; नेटकरी म्हणाले ‘यालाच सिनेमा एडिट करायला द्या’

500 कोटींच्या बजेटला तोडीस तोड रिक्रिएट केला 'आदिपुरुष'चा सीन; पहा Video

Adipurush: युट्यूबरने रिक्रिएट केला 'आदिपुरुष'चा अंडरवॉटर सीन; नेटकरी म्हणाले 'यालाच सिनेमा एडिट करायला द्या'
500 कोटींच्या बजेटला तोडीस तोड रिक्रिएट केला 'आदिपुरुष'चा सीनImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 28, 2022 | 9:37 AM
Share

मुंबई: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा नेटकऱ्यांकडून त्यावर खूप टीका झाली. आदिपुरुषच्या टीझरमधील VFX ची सर्वाधिक खिल्ली उडवली गेली. हा वाढता विरोध पाहता अखेर निर्मात्यांनी चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कलाकारांच्या लूकवर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. याच कारणासाठी प्रदर्शनाची तारीखसुद्धा पुढे ढकलण्यात आली. आता एका युट्यूबरने ‘आदिपुरुष’च्या टीझरमधील प्रभासचं अंडरवॉटर सीन रिक्रिएट केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आदिपुरुषच्या टीझरची सुरुवात प्रभासच्या याच अंडरवॉटर सीनने होती. हा सीन या युट्यूबरने थ्रीडीमध्ये हुबेहूब रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला टीझरची एक झलक पहायला मिळते. त्यानंतर तो युट्यूबर स्वत: 3D स्कॅन कसा केला आणि त्यानंतर ब्लेंडरमध्ये सीन कसा तयार झाला, हे दाखवतो.

व्हिडीओच्या अखेरीस जेव्हा रिक्रिएट केलेला सीन पहायला मिळतो, तेव्हा तो हुबेहूब आदिपुरुषमधल्या टीझरसारखा वाटतो. त्यामुळे नेटकऱ्यांकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या आदिपुरुषपेक्षा हा व्हिडीओ सुंदर आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘एक युट्यूबरच आदिपुरुषच्या संपूर्ण VFX टीमपेक्षा चांगलं काम करू शकतो’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं.

View this post on Instagram

A post shared by K U N W ∆ R (@itx_kunwar)

याआधीही ‘आदिपुरुष’च्या टीझरमधील सैफ अली खानचा ड्रॅगन सीन एका युजरने रिक्रिएट केला होता. तो व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

आदिपुरुष हा चित्रपट जून 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जानेवारी 2023 होती. आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.