नवऱ्याचे वाईट कृत्य, मुलाच्या गर्लफ्रेंडने संपवलं आयुष्य… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा…

'माझ्या नवऱ्याचे वाईट कृत्य, मुलाच्या गर्लफ्रेंडने संपवलं आयुष्य...', प्रसिद्ध अभिनेत्रीचं नवरा आणि मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य... मुलाच्या गर्लफ्रेंडने स्वतःचं आयुष्य संपवल्यानंतर कुटुंबिच्या अडचणीत झाली होती वाढ...

नवऱ्याचे वाईट कृत्य, मुलाच्या गर्लफ्रेंडने संपवलं आयुष्य... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 11:01 AM

बॉलिवूडमधील अभिनेत्रींना खासगी आयुष्यात अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री झरीना बहाव हिने देखील खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत झरीना हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने वाईट गोष्टींचा सामना केला आहे. झरीना बहावने नुकताच पती आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये झरीना बावाहने सांगितलं की, तिला पती आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती होतं. पण माहिती असताना देखील अभिनेत्री मौन बाळगून होती.

आदित्य पंचोली याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, 1993 मध्ये आदित्य याचं नाव अभिनेत्री पूजा बेदी हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, पूजाच्या घरातील हाउस हेल्प मुलीसोबत आदित्य पंचोलीने सिनेमांमध्ये काम देण्याचं आमिष देत वाईट कृत्य केलं. तेव्हा पूजा आणि आदित्य रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

कंगना रणौत यांनी केले गंभीर आरोप…

पूजा बेदी हिच्यानंतर आदित्य पंचोली याच्या नावाची चर्चा अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत होऊ लागली. कंगना तेव्हा फक्त 17 वर्षांच्या होत्या. आदित्य पांचोलीने कंगनाला देखील हिरोईन बनवण्याचे आश्वासन देऊन त्यांचं शारीरिक शोषण केलं. तब्बल 4 वर्षांनंतर कंगनाने आदित्य विरोधात पोलिसांत केस दाखल केली. ज्यामध्ये कंगनाने मारहाणीचे आरोपही केले होते.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली आदित्य पंचोलीची बायको झरीना बहाव?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत झरीना बहाव यांनी नवरा आणि मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय आदित्य पंचोली याच्या गर्लफ्रेंडबद्दल देखील झरीना हिला माहिती होतं. झरीना बहाव म्हणाली, ‘नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल मला सर्वकाही माहिती होतं.’ ‘पण मी कधीच त्याला काहीही बोलली नाही. कारण मी आदित्यवर प्रचंड प्रेम करते. तो माझ्याशी कसा वागतो याची मला फक्त काळजी होती. त्याने कधीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने मला कधी कामासाठी नकार दिला नाही. माला वाईट वागणूक दिली नाही..’ असं झरीना नवऱ्यात्या नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल म्हणाली.

शिवाय मुलगा सुरज पंचोली याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील झरीना हिने मोठं वक्तव्य केलं. सुरज याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जिया खान हिने स्वतःला संपवलं आणि सुरज पंचोलीवर गंभीर आरोप केला. ज्यामुळे सुरज कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. जियाच्या मृत्यूबद्दल झरीना म्हणाली, ‘जियाने मृत्यूपूर्वी देखील 4 – 5 वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झरीना बहाव हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?
शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?.
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.