Neha Khan | आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, ‘देवमाणूस’फेम नेहा खानची संघर्षगाथा

बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून नेहा खानने काम केले आहे. (Dev Manus Divya Singh Neha Khan)

Neha Khan | आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, 'देवमाणूस'फेम नेहा खानची संघर्षगाथा
अभिनेत्री नेहा खान

मुंबई : ‘देवमाणूस’ (Dev Manus) या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या (Divya Singh) एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण झाला आहे. गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धंदे दिव्या उघडकीस आणणार, असं वाटत होतं. मात्र आता खुद्द दिव्याच अजितच्या जाळ्यात फसताना दिसत आहे. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (Zee Marathi Serial Dev Manus Fame ACP Divya Singh Actress Neha Khan)

अभिनेत्री नेहा खानचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी. नेहाच्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारलं नाही.

नेहाच्या आई-वडिलांचा आंतरधर्मीय विवाह

नेहाच्या आईची परिस्थिती लग्नाच्या वेळी अत्यंत बिकट होती. नेहाच्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे तिच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी होती. लग्नानंतर आपली परिस्थिती सुधारेल, या आशेने तिने आंतरधर्मीय असूनही विवाह केला. मात्र लग्नानंतर त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही.

आईला शरीरभर 370 टाके

नेहाच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये, म्हणून काही गुंडांनी जोरदार मारहाण केली होती. यामध्ये तिच्या आईला शरीरभर 370 टाके पडले. आपल्यावर आळ येण्याच्या भीतीने त्या काळात वडीलही फरार झाले होते. अशा परिस्थितीतही तिच्या आईने हिंमत दाखवून नेहा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला.

फोटोग्राफरमुळे सौंदर्याची जाणीव

आमच्या शेजारच्या काकू एक दिवस मला फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या. फोटोग्राफरने माझे फोटो काढले आणि मला विचारलं, की तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का? माझ्या घरात आरसा नव्हता. त्यावेळी मला माझ्या सौंदर्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पण फोटोखाली आपलं खान आडनाव दिलं, तर पुन्हा माझ्या वडिलांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील, अशी भीती मला वाटली. त्यामुळे मी नेहा महल्ले असं आईचं आडनाव दिलं. तो फोटो माझ्या परिचित लोकांनी पाहिला आणि मला हिरोईन होण्याचा सल्ला दिला, असं नेहा सांगते.

सीएसएमटी स्टेशनवर पेपर टाकून झोप

नेहा खान मूळ अमरावतीची. मुंबईत ऑडिशनला येण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागायची. वडिलांना समजू नये, यासाठी ती छोटीच बॅग सोबत बाळगायची. फेसबुकवर ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून मुंबई छशिमट स्टेशनवर झोपायचे. दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहा सांगते.

किशोरी शहाणे, सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांन मदत केली आणि युवा हा जिमी शेरगिलसोबत पहिला सिनेमा मला मिळाला. बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. आता देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

संबंधित बातम्या : 

सुसल्या बदलली, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्री साकारणार भूमिका

‘बार्डो’च्या ‘रान पेटलं’साठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, सावनी सांगतेय कसं तयार झालं ‘हे’ गाणं…

(Zee Marathi Serial Dev Manus Fame ACP Divya Singh Actress Neha Khan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI