‘बार्डो’च्या ‘रान पेटलं’साठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, सावनी सांगतेय कसं तयार झालं ‘हे’ गाणं…

सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र (Singer Savaniee Ravindrra) हीला '67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' या चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘बार्डो’च्या ‘रान पेटलं’साठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, सावनी सांगतेय कसं तयार झालं ‘हे’ गाणं...
सावनी रवींद्र
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 3:30 PM

मुंबई : सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र (Singer Savaniee Ravindrra) हीला ‘67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ सोहळ्यात ‘बार्डो’ या चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सावनीने याआधी मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी अशी विविध भाषेतील गाणी गायली आहेत (Singer Savaniee Ravindrra first reaction after getting best singer national award).

मेहनतीचे फळ मिळाले : सावनी

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र या राष्ट्रीय पुरस्काराविषयी सांगताना म्हणते, ‘खरंच, मला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. आजपर्यंतच्या इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं फळ देवाने आज मला दिलं आहे, अशी भावना मनात येते आहे. माझ्या सर्व गुरूजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडीलांचे कष्ट याचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आजवर मी ज्यापद्धतीने गाणी गायली त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून प्रेक्षकांना आवडतील अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा मी कायम प्रयत्न करेन’.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

(Singer Savaniee Ravindrra first reaction after getting best singer national award).

कसं तयार झालं पुरस्कार मिळवून देणारं गाणं?

‘बार्डो’ चित्रपटातील गाण्याविषयी सावनी सांगते, ‘बार्डो’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही आहे. स्वप्नांवर आधारीत असलेल्या बार्डो या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. या चित्रपटातील ‘रान पेटलं’ हे गाणं प्रचंड वेगळं आहे. या गाण्याला आघाडीचे प्रसिद्ध संगीतकार रोहन-रोहन यांचे संगीत लाभले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं रेकॉर्ड करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी माझ्याकडून टोन चेंज करून ग्रामीण पद्धतीच्या आवाजात गाणं गाऊन घेतलं.

मी आजवर रोमॅंटिक, इमोशनल अश्या पद्धतीची गाणी माझ्या नॅचरल आवाजात गायली आहेत. परंतु मी माझं ओरीजनल आवाजाचं टेक्शचर बदलून ग्रामीण पद्धतीत गायन करू शकते, हा विश्वास त्यांनी मला दिला. आणि एक वेगळी कलाकृती निर्माण झाली. मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या सेटअपवर हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं. अत्यंत भावूक करणारं हे गाणं आहे.

पुढे सावनी म्हणते, ‘आयुष्यात पहिल्यांदा मिळालेला पुरस्कार सर्वात स्पेशल असतो. मला आजपर्यंत विविध ठिकाणी नामांकन मिळाली. पण पुरस्कार कधी मिळाला नव्हता. मी गायलेल्या गाण्यासाठी, मला पुरस्कार मिळावा या प्रतिक्षेत मी केव्हापासून होते. आणि तो क्षण आलाचं, मी गायन केलेल्या ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी मला पहिल्यांदाच ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. मी ईश्वराची, प्रेक्षकांची आणि माझ्या सर्व गुरूजनांची कायम ऋणी असेन.’

(Singer Savaniee Ravindrra first reaction after getting best singer national award)

हेही वाचा :

Malaika Arora | मलायकाने चोरी केली चक्क रस्त्यावरची फुले, चाहत्यांनी विचारताच म्हणाली…

Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईकांच्या पाप…शाप… आणि उ:शापाचा खेळ! अशी रंगणार मालिकेची कथा…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.