Corona LIVE : कोरोना संशयितांची घरीच तपासणी होणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

Corona LIVE : कोरोना संशयितांची घरीच तपासणी होणार, मुंबई महापालिकेचा निर्णय
Picture

कोरोना संशयितांची घरीच तपासणी होणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई : कोरोना संशयितांची घरीच तपासणी होणार, मुंबई महापालिकेचा निर्णय, पुढच्या दोन दिवसांत प्रक्रिया सुरु करणार, महापालिका हेल्पलाईन नंबर लवकच जारी करणार, मुंबईत असणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

23/03/2020,10:38AM
Picture

महाराष्ट्राला मोठा दिलासा; पुण्यात दाम्पत्यावर यशस्वी उपचार, पहिले रुग्ण निगेटीव्ह

पुणे : महाराष्ट्रात सर्वात अगोदर कोरोनाची लागण झालेले दाम्पत्य ठणठणीत, पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाम्पत्यावर यशस्वी उपचार, दाम्पत्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली

23/03/2020,9:08AM
Picture

सांगलीत कोरोनाचे चार नवे रुग्ण, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण

सांगलीत एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण, चारही जण सौदी अरेबियातून आले, हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते, सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये होते, चौघांचे रिपोर्ट आज आले, चौघांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह, कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने खळबळ, मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चौघंवर उपचार सुरु

23/03/2020,7:52AM
Picture

सेशन कोर्ट 31 मार्चंपर्यंत बंद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सेशन कोर्ट 31 मार्चपर्यंत बंद, सेशन कोर्टात पोलीस, वकील, गुन्हेगार, त्यांचे नातेवाईक यांची वर्दळ, संक्रमण होऊ नये यासाठी बंदचे आदेश, सेश न कोर्टाचे प्रिन्सिपल जज चांदवानींचे आदेश

23/03/2020,4:27AM
Picture

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर पोलिसांकडून जोरदार तपासणी, ट्रॅव्हल हिस्ट्री तपासूनच जिल्ह्यात सोडल्या जातात गाड्या, किनी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

23/03/2020,4:10PM
Picture

बीड : कोरोना पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी लागू, 11 ते 3 पर्यंत जीवनावश्यक सेवा सुरु राहातील, मात्र दुपारी 3 नंतर जिल्ह्यात कडक संचार बंदी, आज रात्रीपासून बाहेरील नागरिकांसाठी पूर्णपणे जिल्हा बंदी, केवळ 5 लोक वाहतूक होणाऱ्या वाहनांना प्रवेश, जड वाहनांना प्रवेश बंद; गर्दी टाळण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांची माहिती

23/03/2020,4:08PM
Picture

रत्नागिरी : रत्नागिरीत 3 तासात 600 वाहन चालकांवर कारवाई ट्राफिक पोलिसांची धडक कारवाई, आवश्यकता नसेल तर बाहेर फिरु नका, पोलिसांचं आवाहन

23/03/2020,2:03PM
Picture

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड बुधवार पासून बंद, तब्बल सात दिवस मार्केट यार्ड बंद राहणार, मंगळवारी एक दिवस मार्केट सुरु राहणार, शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी एक दिवस सुरु राहणार

23/03/2020,2:02PM
Picture

मुंबई : उद्या आणि परवा दोन दिवस वृत्तपत्र वितरण पूर्णपणे बंद राहणार, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटना नेत्यांच्या बैठकीतील निर्णय, बुधवारी दुपारी पुन्हा बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल.

23/03/2020,1:58PM
Picture

पुणे : शहरातील वाहतूक थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता, दुपारपासून वाहनांना शहरात बंदी करण्याच्या भूमिकेत पोलीस प्रशासन, तीन वाजल्यापासून शहरातील वाहतूक थांबण्याची शक्यता, यासंदर्भात पोलीस प्रशासनाची महत्वाची बैठक सुरु

23/03/2020,1:40PM
Picture

सांगली : नेपाळहून आलेली खाजगी प्रवासी बस पोलिसांनी पकडली, तीर्थ यात्रेला गेलेले 28 प्रवासी, मिरज आणि कोल्हापूरचे आहेत प्रवासी, एका प्रवाशाला खोकला असल्याने मिरज सिव्हिलमध्ये दाखल केले, 9 मिरजेचे आणि 21 कोल्हापूर चे प्रवासी बसमधील प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का

23/03/2020,1:32PM
Picture

पुणे : पुण्यात 9 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन रुग्णांचा आज चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण, दोन्ही रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पाठवला, आज सायंकाळी दोन्ही रुग्णांचे अहवाल येण्याची शक्यता

23/03/2020,1:27PM
Picture

पुणे : पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर वाहनांची गर्दी, टोल नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा, यात खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक

23/03/2020,1:13PM
Picture

सोलापूर : जमावबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना अनोख्या पद्धतीने धडा, “मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात थांबणार नाही” अशा आशयाचे फलक घेऊन काढले फोटो, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना विनाकारण जमणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी केला बंदोबस्त

23/03/2020,1:06PM
Picture

विरार : अत्यावश्यक सेवा म्हणून चालू ठेवलेल्या भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची लूट सुरु, विरारमधील धक्कादायक प्रकार, विरार पूर्व स्टेशन जवळील भाजी मार्केटमध्ये हा प्रकार

23/03/2020,1:02PM
Picture

मुंबई : एन्टोप हिल मार्केट (नूरा बाजार )मध्ये लोकांची रस्त्यावर गर्दी, कोरोना वायरसची भीती दिसत नाही, भाजी मार्केटमध्ये खरेदी, कलम 144 ची भीती नाही, अनेक जण मास्क न लावता ही खरेदी करण्यात व्यस्त

23/03/2020,1:01PM
Picture

कोल्हापूर : इचलकरंजीत राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई, इचलकरंजी नदी वेस नाका येथे दोन गाडीवर छापा टाकून देशी विदेशी बनावटी दारु केली जप्त, राज उत्पादन शुल्क छाप यामध्ये नऊ लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त यामध्ये दोन गाड्या विदेशी दारु जप्त, तिघांना अटक

23/03/2020,12:56PM
Picture

नवी मुंबई – कळंबोलची वाहतूक ट्रॅफिक पोलिसांनी अडवली, मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखली

23/03/2020,12:51PM
Picture

मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी काम करायला जात असल्यानं महिलेलाही कोरोनाचा संसर्ग, ही महिला मुंबईतील ज्या भागात राहते त्या भागाची कसून तपासणी, महिलेच्या घरातील व्यक्तींचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह

23/03/2020,11:57AM
Picture

एमपीएससीची 5 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, कोरोना संकटामुळं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

23/03/2020,11:55AM
Picture

राज्य आणि केंद्र सरकारच्या सूचना गांभीर्याने घ्या, स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी घरीच थांबा, शरद पवारांचं नागरिकांना आवाहन

23/03/2020,11:53AM
Picture

मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर पोलीस आयुक्त नजर ठेवून आहेत, तिथली गर्दी कमी करणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:51AM
Picture

जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:51AM
Picture

धोका वाटणाऱ्या सीमा बंदिस्त करत आहोत, गोवा बॉर्डर तूर्तास सील, बाकीच्या बाबत निर्णय होतोय – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:49AM
Picture

फिलिपिन्स नागरिकाचा मृत्यू, आधी कस्तुरबा, नंतर रिलायन्समध्ये उपचार, त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासावा लागेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:48AM
Picture

८९ जणांपैकी दोन रुग्ण आयसीयूमध्ये, सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:47AM
Picture

स्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, संसर्ग टाळण्यासाठी घरी राहा, अन्यथा पोलीस कारवाई – आरोग्य मंत्री राजेश टोपे

23/03/2020,11:46AM
Picture

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, 24 तासात 15 नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 89 वर, 24 तासात 15 नव्या रुग्णांची भर, मुंबईत 14, तर पुण्यात एक नवा कोरोनाग्रस्त

23/03/2020,9:26AM
Picture

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डला मोफत मास्क वाटप

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डला मोफत मास्क वाटप, मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मास्क वाटप, शेतकरी ग्राहक व्यापारी यांना मास्क वाटप, मास्क घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

23/03/2020,9:41AM
Picture

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार पेठेत फळ-भाज्यांची आवक घट

कोल्हापूर : जनता कर्फ्यू आणि महाराष्ट्र लॉक डाऊनचा परिणाम, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार पेठेत फळ-भाज्यांची आवक घटली, आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ

23/03/2020,9:24AM
Picture

नागपुरात सात कोरोना संशयित रुग्णालयात दाखल

नागपूर : सात कोरोना संशयित मेयो रुग्णालयात दाखल, सातही संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले, संशयितांच्या रिपोर्टची प्रतिक्षा, नागपुरात सध्या चार कोरोनाबाधित रुग्ण

23/03/2020,9:21AM
Picture

नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराच्या परिसरात सर्व्हेक्षण

नागपूर : शहरातील चारही रुग्णांच्या घराच्या परिसरातील तीन किलोमीटर परिसरात सर्वेक्षण, परिसरातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना, खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण

23/03/2020,9:17AM
Picture

सरकारने भाजीपाला बाजार सुरु करावे, शेतकरी व्यापाऱ्यांची मागणी

कराड : कराडमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत, कराड बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील भाजीपाला मालाला गावोगावचे बाजार बंद असल्याने उठाव कमी, सरकारने भाजीपाला बाजार सुरु करावे शेतकरी व्यापाऱ्यांची मागणी

23/03/2020,9:12AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड पुन्हा बंद

पुणे : तीन दिवसाच्या बंद नंतर चौथ्या दिवशी मार्केट सुरु झालं, मात्र, चौथ्या दिवशी आवक निम्म्यावर, त्यामुळे पुन्हा मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा कामगार संघटना इशारा, त्याचबरोबर आडतेसोसिएशनही बंद ठेवण्याचा भूमिकेत, यासंदर्भात दोन्ही संघटनांच्या थोड्याच वेळात बैठका होणार, 20 ते 25 टक्के मालाच्या किमती वाढल्या, मात्र पुन्हा बंद ठेवल्यानंतर शेतमालाचे दर भडकण्याची भीती

23/03/2020,9:11AM
Picture

जनता संचारबंदीला पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे : जनता संचारबंदीला प्रतिसाद, रेल्वे, एसटी, पीएमपी ठप्प, लोणावळा लोकल ही रिकाम्या धावल्या, सकाळी मार्गावर असलेल्या पीएमपीच्या काही बस दुपारनंतर आगारात स्थिरावल्या, तर एसटीची एकही बस मार्गावर धावली नाही, रेल्वेच्या तेरा लोणावळा लोकलही रिकाम्या धावल्या, तर निम्मे विमानांचे उड्डाण झाले नाही, रविवारी विमानतळावर 40 विमाने उतरली आणि चाळीस विमानांनी उड्डाण केले मात्र प्रवासी संख्या दोन हजार पेक्षा कमी

23/03/2020,8:55AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *