गेट वेल सून इरफान!

मुंबई : ट्यूमरशी दोन हात करत असलेला अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार आहे. लंडनमध्ये इरफान खानवरील उपचार पूर्ण झाले आहेत. इरफानच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यामुळे तो मुंबईत परतणार असून, लवकरच आगामी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करेल, असं सांगण्यात येत आहे. इरफान खान आगामी हिंदी मीडियम 2 या सिनेमात दिसणार आहे. त्याच सिनेमाचं शूटिंग …

, गेट वेल सून इरफान!

मुंबई : ट्यूमरशी दोन हात करत असलेला अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार आहे. लंडनमध्ये इरफान खानवरील उपचार पूर्ण झाले आहेत. इरफानच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यामुळे तो मुंबईत परतणार असून, लवकरच आगामी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करेल, असं सांगण्यात येत आहे. इरफान खान आगामी हिंदी मीडियम 2 या सिनेमात दिसणार आहे. त्याच सिनेमाचं शूटिंग इरफान सुरु करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान खानच्या हिंदी मीडियम 2 या सिनेमाचं शूटिंग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. या सिनेमाची टीम लंडनला गेली होती. तिथे त्यांनी इरफान खानला सिनेमाची कथा ऐकवली. त्यानंतर या सिनेमाच्या शूटिंगचं वेळापत्रक बनवण्यात आलं.

इरफान खान गेल्या अनेक दिवसांपासून लंडनमध्ये उपचार घेत आहे. इरफान न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरमने त्रस्त आहे. उपचारादरम्यान इरफानने सोशल मीडियाला आपला मित्र बनवलं आहे. सातत्याने तो फॅन्सना सोशल मीडियावरुन अपडेट्स देत असतो.

या आजारपणानंतर एका मुलाखतीदरम्यान, इरफान म्हणाला होता की, मी या आजाराने त्रस्त आहे. मी काही महिन्यात किंवा वर्षभरात मरणार आहे. आयुष्याने जे दिलंय, ते त्या पद्धतीनेच जगावं लागेल. मला आयुष्याकडून खूप काही मिळालंय. मी डोळ्यांवर पट्टी बांधून चालत होतो, त्यामुळे मी पाहूच शकलो नाही की मला आयुष्याने नेमकं काय दिलंय.

यावर इरफान म्हणाला होता, आयुष्य तुमच्यासमोर अनेक आव्हानं उभी करतं. मात्र मी या पद्धतीने विचार करणं सुरु केलं आहे, ज्यामुळे शारीरिक, भावनिक आणि मानसिकरित्या पडताळणी करु शकू. सुरुवातीला मी घाबरलो होतो. मला माहित नव्हतं. मी खूपच कमजोर होतो.  मात्र हळूहळू आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोण मिळाला, ज्यामुळे मी पुन्हा उभं राहिलो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *