AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे (Harshvardhan Jadhav demand Shut down Bajaj Company).

श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, हर्षवर्धन जाधव यांची मागणी
| Updated on: Jul 01, 2020 | 11:53 AM
Share

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे (Harshvardhan Jadhav demand Shut down Bajaj Company). बजाज कंपनीतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार झाल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे (Harshvardhan Jadhav demand Shut down Bajaj Company).

हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देवून कंपनी बंद करावी”, अशी विनंती हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

हर्षवर्धन जाधव नेमकं काय म्हणाले?

औरंगाबाद येथील बजाज कंपनीत जवळपास 140 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन किती लाचार झालंय हे आता त्यातून दिसतंय. बजाजचे खिशे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकणं हे भयंकर आहे. मी प्रशासनाचा निषेध करतो.

भारत सरकारच्या 18 मे 2020 रोजीच्या जीआरनुसार कलम 6 अंतर्गत दोन पेक्षा अधिक रुग्ण एखाद्या कंपनीत आढळले, तर अशा कंपनीला ताबोडतोब बंद करुन 48 तासात सॅनेटाईज केलं पाहिजे. बजाज कंपनीत 140 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीही कंपनी चालू आहे. लोकं मेले तरी चालतील. पण बजाजला कुणी हात लावायचा नाही.

हेही वाचा : ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?

कामगारांचा जीव धोक्यात टाकून कंपनी चालत असेल तर ती कंपनी काहीच उपयोगाची नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देवून ही कंपनी बंद करा. कोविड टास्क फोर्सच्या अध्यक्षांनादेखील मी विनंती करतो की, ताबोडतोब ही कंपनी बंद करुन सॅनेटाईज करा, अन्यथा प्रादुर्भाव वाढेल.

तुम्ही जर हे केलं नाहीत तर मी हायकोर्टात जाईल आणि याचिका दाखल करेन. तुमच्या सगळ्यांवर कसे गुन्हे दाखल होतील ते मी बघेन. कारण लोकांचा जीव घेऊन तुम्ही खळगी भरत आहात. बजाज देवा पेक्षा मोठा आहे का? माझं बजाजशी काही भांडण नाही. मात्र, अशी परिस्थिती असेल तर कारवाई केलीच पाहिजे. फक्त बजाजच नाही तर अशी परिस्थिती ज्या कंपन्यांत असेल त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे.

औरंगाबादमधील सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे.

कोण आहेत हर्षवर्धन ?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

हेही वाचा : एटीएम ते मिनिमम बॅलन्स; बँकिंग नियम पूर्वपदावर, आजपासून ‘हे’ दहा बदल

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.