कॉलिंग आणि नेट वर्षभर फ्री, जिओचा धमाकेदार प्लॅन

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात जिओने पदार्पण केल्यानंतर इतर कंपन्यांची झोप उडाली आहे. जिओने वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी बाजारात नवनवीन धमाकेदार प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षात टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘जिओ दिवाळी धमाका’ हा प्लॅन लाँच केला होता. आता या प्लॅनअंतर्गत पुढच्या दिवाळीपर्यंत 100 टक्के कॅशबॅकचा फायदा …

कॉलिंग आणि नेट वर्षभर फ्री, जिओचा धमाकेदार प्लॅन

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात जिओने पदार्पण केल्यानंतर इतर कंपन्यांची झोप उडाली आहे. जिओने वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी बाजारात नवनवीन धमाकेदार प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षात टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘जिओ दिवाळी धमाका’ हा प्लॅन लाँच केला होता. आता या प्लॅनअंतर्गत पुढच्या दिवाळीपर्यंत 100 टक्के कॅशबॅकचा फायदा घेता येणार आहे.

‘जिओ दिवाळी धमाका’ हा प्लॅन 1699 रूपयांचा असून, या प्लॅनअंतर्गत रिचार्ज केल्यानंतर एक वर्षापर्यंत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मोफत मिळवता येणार आहे.

येत्या दिवाळीपर्यंत या प्लॅनचा फायदा मिळवता येणार आहे. या प्लॅननुसार प्रतिदिन 1.5 GB डेटा ग्राहकांना मिळेल. यामुळे एकूण 547 GB डेटा वर्षभर वापरता येईल.

जिओच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, “1699 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळेन. तसेच, 149 रूपयांपेक्षा अधिक रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हा सर्व कॅशबॅक My jio या अॅपवर डिजीटल स्वरुपात मिळेन.”

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *