पुढील एक महिना मुंब्य्रात कार्यक्रमाला येणार नाही : जितेंद्र आव्हाड

मुंब्य्रात नागरिक सोशल डिस्टन्सिंग तसेच कायद्याचे पालन करत नसल्याने यापुढे एक महिना मुंब्य्रात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. (Jitendra Awhad Comment On Mumbra Social Distancing Violation)

पुढील एक महिना मुंब्य्रात कार्यक्रमाला येणार नाही : जितेंद्र आव्हाड

ठाणे : दिवसागणिक आता कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून ही धोक्याची घंटा आहे. मात्र तरीही मुंब्य्रात नागरिक सोशल डिस्टन्सिंग तसेच कायद्याचे पालन करत नसल्याने यापुढे एक महिना मुंब्य्रात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे (Jitendra Awhad Comment On Mumbra Social Distancing Violation)

दोन दिवसांपूर्वी मुंब्य्रात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी मुंब्य्रात राष्ट्रवादी पक्षाच्या हौशी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीत आणि रुग्णवाहिका सेवेत अक्षरशः सोशल डिस्टनसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सोशल आणि फिजिकल डिस्टनसिंग राखण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.

“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वच्छता अभियानाची सुरूवात केलीये. मुंब्रा शहर स्वच्छ राहिलं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने काम करत आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांचं काम सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी कसा होईल, मुंब्य्रात पेशंट वाढणार नाहीत, याची काळजी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेत आहेत”, असं आव्हाड म्हणाले.

“यापुढचा एक महिना मी मुंब्रा शहरात एकही कार्यक्रम घेणार नाही. समजदारीची गोष्ट आहे की ज्या मुंब्रा शहरात काही दिवसांपूर्वी रूग्णसंख्या शून्यावर आली होती ती रूग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढचा एक महिना आता मुंब्रा शहरात कार्यक्रम घेणार नसल्याची”, भूमिका आव्हाडांनी घेतली आहे.

“मुंब्रा कळवावासियांना मी हात जोडून विनंती करतो की आपण फिजीकल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्कचा वापर करा, बाहेर पडताना एकमेकांपासून अंतर राखा तसंच अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नका”, असं आव्हाड म्हणालेत.

आता जर नागरिक फिजिकल डिस्टनसिंग पाळणार नाहीत तर यापुढे मुंब्र्यात एक महिना येणार नसल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले असून यानंतर तरी मुंब्य्रातील नागरिक जबाबदारीने वागतील का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

(Jitendra Awhad Comment On Mumbra Social Distancing Violation)

संबंधित बातम्या

कोरोनावर लक्ष देणं महत्त्वाचे, कठीण परिस्थितीत घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही : जितेंद्र आव्हाड

वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले, जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

Navi Mumbai | नवी मुंबईत लवकरच कोरोना टेस्ट लॅब : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *