…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु, मराठा समाजाचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(Maratha Community will do agitation if not get reservation)

...अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु, मराठा समाजाचा इशारा
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 9:15 PM

पंढरपूर : मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. जर 20 सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. नुकतंच पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला रामभाऊ गायकवाड, धनाजीराव साखळकर, सागर यादव, किरण घाडगे, संदीप मांडवे यांनी हजेरी लावली. (Maratha Community will do agitation if not get reservation)

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती देत आरक्षणाचे लाभ थांबवले आहेत. या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच युवकांना नोकरीसाठी आरक्षण उपयुक्त आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला आता अल्टिमेटम दिला आहे. जर 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर 21 सप्टेंबरपासून मराठा समाजाच्या रोषाला सरकारला तयार रहावे लागेल. मराठा समाजातील अनेक लोक गनिमी काव्याने समाजातील आंदोलन करतील. याची सगळी जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. (Maratha Community will do agitation if not get reservation)

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मराठा समाजाने संयम बाळगावा, अशोक चव्हाणांचं आवाहन

मराठा आरक्षण हे कॉंग्रेसच्या काही नेत्यांना कमीपणा वाटते, सरकार गंभीर नाही : चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.