‘चाय-बिस्कुट’ खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत : रोहित पवार

'चाय-बिस्कुट' खातील पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत, असं म्हणत हाथरस प्रकरणात बेजबाबदार वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे. (NCP Rohit Pawar Slam Journalist Who Polics in Hathras Rape Case)

'चाय-बिस्कुट' खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत : रोहित पवार
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 4:16 PM

मुंबई : हाथरस प्रकरणात बेजबाबदार वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे. विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय?, असा उद्विग्न सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. (NCP Rohit Pawar Slam Journalist Who Polics in Hathras Rape Case) तसंच ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत, असं मतंही त्यांनी व्यक्त केलंय.

रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीचा व्हिडीओ पोस्ट करत, “पीडितेची बातमी दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीताच त्यांनी सुरू केलीय. ते तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणंच अधिक संयुक्तिक ठरेल”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केलाय.

“यापेक्षा कितीतरी अधिक उत्तम माझे मराठी आणि महाराष्ट्रात काम करणारे इतर पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकत नाहीत”, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलंय. त्याचसोबत रोहित पवार यांनी एबीपी न्यूजच्या पत्रकार प्रतिमा मिश्रा यांचं कौतुक केलंय. “प्रतिमा मिश्रा या हिंदी माध्यमाच्या पत्रकार भगिनीची कामगिरीही अभिमान वाटावी, अशी आहे. त्यामुळं आभाळ फाटलंय पण शिवणारेही खंबीर आहेत”, असं ते म्हणाले.

“एकतर सरकारकडून हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबाला गुन्हेगारांसारखी वागणूक मिळतेय. त्यांना घरात बंद करुन त्यांच्याकडील फोन हिसकावून घेतलेत आणि संपूर्ण गावाला पोलीस छावणीचं स्वरुप दिलंय. का तर पीडित कुटुंबाला कुणी भेटू नये म्हणून. एवढंच नाही तर तिथं जाणाऱ्या खासदारांनाही मारहाण केली जातेय. पत्रकारांचे फोन टॅप करुन दिशाभूल करणारे ऑडिओ फिरवले जात आहेत, याला काय म्हणावं?”, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.

“भारतीय पत्रकारिता ही उच्च मूल्ये असलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात टिळक, आगरकर यांच्या जहाल पत्रकारितेचा सिंहाचा वाटा आहे. पण गेल्या काही काळातील घटनांवरून विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय?”, असा प्रश्न पडत असल्याचं रोहित म्हणाले.

(NCP Rohit Pawar Slam Journalist Who Polics in Hathras Rape Case)

संबंधित बातम्या

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

LIVE | राहुल आणि प्रियंका गांधींसह 35 खासदारही हाथरसला जाणार

Hathras Case | हाथरस प्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.