भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. (Pankaja Munde First Reaction On Bjp Working Committee)

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईभाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर झाली. या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील 8 नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय मंत्रीपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे पंकजांनी आभार मानले. (Pankaja Munde First Reaction On Bjp Working Committee)

आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पंकजा यांनी पक्षनेत्यांचे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. माझ्यावर टाकलेली राष्ट्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. या जबाबदारीला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असं त्या म्हणाल्या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या तसंच स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिली. तसंच कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या नेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

पंकजा मुंडे यांच्याबरोबर विनोद तावडे यांची देखील वर्णी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये लागली आहे. त्यांनाही राष्ट्रीय मंत्रीपदी त्यांना स्थान देण्यात आलं आहे. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत लोकसभा खासदार हिना गावित यांना स्थान दिलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 12 उपाध्यक्ष, महामंत्री 8, संघटन महामंत्री 1 , सहसंघटन महामंत्री 3 असा समावेश आहे.

भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कुणाला स्थान?

  • पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री)
  • विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री)
  • विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री)
  • सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री)
  • व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री)
  • जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
  • हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता)
  • संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता)

भाजपच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर आणि सुनिल देवधर यांची वर्णी लागली आहे. तर सहसंघटन मंत्री म्हणून व्ही. सतीश यांची तर अल्पसंख्यक मोर्चावर जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(Pankaja Munde First Reaction On Bjp Working Committee)

संबंधित बातम्या

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *