AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार

मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील.

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार
| Updated on: Jul 27, 2020 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक होणार आहे. नड्डा दिल्लीतून बैठकीत सहभागी होतील, तर मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील. (BJP President JP Nadda holds Maharashtra BJP executive committee meeting)

भाजपची राज्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, उद्धव ठाकरेंनी सरकार पाडून दाखवण्याबाबत दिलेले आव्हान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेली टीका आणि राज्यातील कोरोनाची स्थिती या पार्श्वभूमीवर बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीत कोण कोण?

प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य 69 असतील, तर निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.

नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. महत्त्वाचं म्हणजे राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

भाजपची कार्यकारिणी 

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष –माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष

सेक्रेटरी –

माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ

(BJP President JP Nadda holds Maharashtra BJP executive committee meeting)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.