अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!

मुंबई: अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला आहे. पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे दावा केला होता.  मात्र जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे सहा मतदारसंघावरुन अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे अनिल …

, अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!

मुंबई: अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला आहे. पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे दावा केला होता.  मात्र जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे सहा मतदारसंघावरुन अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे.

अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरु आहे.

भाजपचे अनिल शिरोळे सध्या पुणे लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांचा मोठा पराभव झाला होता. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता.

या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. शिवाय राष्ट्रवादीची ताकदही जास्त आहे, असा दावा राष्ट्रवादीचा होता. मात्र आता राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

मित्रपक्षांना तीन जागा?

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत येणाऱ्या मित्रपक्षांना लोकसभेच्या तीन जागा मिळण्याची शक्यता. यामध्ये पालघर लोकसभेची जागा – बहुजन विकास आघाडी, अकोला – भारिप बहुजन महासंघ (जर प्रकाश आंबेडकर आघाडीत आले तर) आणि हातकणंगले -स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात येणार आहे.

या तीन जागा मित्रपक्षांना सोडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची तयारी आहे.

दुसरीकडे राजेंद्र गवई यांची अमरावती जागेची मागणी आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली आहे, ज्याला गवई तयार नसल्याचे समजते.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागांची मागणी केली, पण सहाच्या सहा जागा मिळाव्यात असा आग्रह नाही. किमान समान कार्यक्रमाबाबत मात्र राजू शेट्टी आग्रही आहेत.  कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, वर्धा, बुलढाणा, माढा या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितल्या आहेत. शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल अशा छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत संधी देणार आहेत.

संबंधित बातम्या 

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, माधुरी दीक्षित म्हणते…  

धक धक गर्ल पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *