निवडणुका जाहीर, पण मतदान ओळखपत्र नाही? सोपे पर्याय-

21 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल. 

, निवडणुका जाहीर, पण मतदान ओळखपत्र नाही? सोपे पर्याय-

मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Poll dates Maharashtra) घोषणा केली. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्राचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी असेल. 21 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदान ओळखपत्राऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्र तुम्ही मतदान करता वेळेस घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. याबद्दल सरकारने काही सूचनाही दिल्या आहेत.

सूचना :

 • फोटो ओळखपत्रावर तुम्ही मतदान करु शकत नाही. यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.
 • मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत वरील दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?

 • पासपोर्ट
 • वाहन चालक परवाना
 • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम
 • सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)
 • छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
 • पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड
 • मनरेगा कार्यक्रमपत्रिका
 • कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
 • छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज
 • खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र
 • आधारकार्ड

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

 • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
 • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
 • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
 • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
 • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
 • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

संबंधित बातम्या 

LIVE UPDATE | महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी  

Maharashtra Assembly Election | आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?    

उदयनराजे होल्डवर, साताऱ्यातील पोटनिवडणूक तूर्तास नाही 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *