AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deficiency of Vitamin D : 4 पैकी 3 लोकांमध्ये आढळते या व्हिटॅमिनची कमतरता; तज्ज्ञांकडून जाणून घ्या यामागचे कारण

आपल्या देशात जवळपास 9 महीने उन्हाळा असतो, तरीही देशातील बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते. हे चिंतेचे कारण आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Deficiency of Vitamin D : 4 पैकी 3 लोकांमध्ये आढळते या व्हिटॅमिनची कमतरता; तज्ज्ञांकडून जाणून घ्या यामागचे कारण
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 01, 2023 | 7:37 AM
Share

नवी दिल्ली – बिघडलेली लाईफस्टाईल, व्यायामाचा पत्ता नाही आणि पौष्टिक आहार खायचा सोडून चटकमटक खात जिभेचे चोचले पुरवण्याच्या अयोग्य सवयी सध्या बहुतांश लोकांमध्ये दिसून येतात. सकस, पौष्टिक आहार न मिळाल्यामुळे लोकांच्या शरीरात अनेक व्हिटॅमिन्सची (vitamins) कमतरता जाणवत आहे. यामध्ये बहुतांश लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने (vitamin D defeciency) त्रस्त आहेत. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की 4 पैकी 3 लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. देशातील 27 शहरांमधील सुमारे 2.2 लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. ही कमतरता तरुणांमध्ये (youth) जास्त दिसून येते.

अशा वेळी हे जाणून घेणे महत्वाचे ठरते की लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता का आहे? आणि या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीराचे काय नुकसान होते, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे कारण

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क. आजकाल लोक दिवसभर ऑफिसमध्ये असतात. घरातून ऑफिस आणि इतर कामांसाठी थेट जातात. या दरम्यान, त्यांच्या शरीराचा सूर्यप्रकाशाशी फारसा संबंध येत नाही. तसेच अनेक लोक त्यांच्या त्वचेबद्दल खूप जागरूक असतात किंवा अती काळजी घेतात. उन्हापासून चेहऱ्याचे रक्षण करण्यासाठी लोक सूर्यप्रकाश चेहऱ्यावर तसेच इतर कोणत्याही भागावर पडू देत नाहीत, त्यामुळे व्हिटॅमिन डी तयार होत नाही. लोकांना वाटते की सूर्यप्रकाशात गेल्यामुळे त्यांचा रंग काळवंडेल किंवा गडद होईल. त्यामुळे अनेकजण उन्हापासून दूर राहतात. आपल्या देशात जवळपास 9 महीने उन्हाळा असतो, तरीही देशातील बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते. हे चिंतेचे कारण आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आहाराच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करता येते ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाले की मग औषधे किंवा इंजेक्शन्सद्वारे त्याची पातळी वाढवली जाते. अशा परिस्थितीत जे लोक उन्हात जास्त जात नाहीत, त्यांनी आपल्या आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी साठी तुम्ही आहारात गाजर, दूध, दही, संत्री आणि टूना मासे यांचा समावेश करू शकता.

सकाळचे (कोवळे) ऊन त्रासदायक नसते

डॉ सांगतात की सकाळी 6 ते 8 या वेळेत उन्हात बसण्यात काही नुकसान नाही. या दरम्यान, तुम्ही 20 ते 25 मिनिटे उन्हात बसू शकता. उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तो झाकू शकता, पण शरीराच्या इतर भागावर सूर्यप्रकास पडला पाहिजे.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी ?

– थकवा जाणवणे

– हाडांमध्ये वेदना

– केस गळणे

– पायांमध्ये वेदना होणे

– दु:खी वाटणे

– स्नायूंमध्ये वेदना होणे

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.