वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात? ब्रेकफास्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ खा वजन होईल झटपट कमी..
Makhana for Weightloss: मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. मखान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, आणि कॅल्शियम असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि त्यामधील फायबर आणि फॉस्फरस वजन कमी करण्यास मदत करतात.

मखाना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मखाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी राहाण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, मखान्यांचे दररोज सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मखान्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्योसबतच मखान्यांमध्ये वृद्धविरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. चला तर जाणून घेऊया मखाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
तुमच्या ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही मखान्यांचे सेवन केले तर तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्वं मिळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. मखान्यांमधील कार्बोहायड्रेट्स, लोह आणि फॉस्फरस तुमच्या शरीरामधील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहाराध्ये किंवा आठवड्यातून दोन वेळा मखान्यांचे सेवन करू शकता. मखान्याचे सेवन तुम्ही विविध पदार्थ बनवून करू शकता. आजकाल अनेकांना मखाण्याच्या खीरीचे सेवन करण्यास आवडते.
मखान्याचे सेवन तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मखान्यांमध्ये अमीनो आम्ल आणि प्राथिने आढळतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. मखान्याचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या आणि पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. माखाने खाल्ल्यामुळे तुमची त्वचा मऊ होण्यास मदत होते. मखान्यांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. मखाणे खाल्ल्यामुळे पुरूशांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. त्यामुळे व्यायाम किंवा जीम केल्यानंतर मखाण्यांचे सेवन केले पाहिजेल. माखान्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच मखाने खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होतो आणि तुमचं मन शांत राहाण्यास मदत होते. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्यामध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मखान्याचे सेवन करू शकता.




मखाने ‘या’ पद्धतीनं खऊ शकता
- तुम्ही मखाने पॅनमध्ये टॉस मकून खाऊ शकता त्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर करू शकता.
- तुम्ही मखान्यांना दुधात उकळून खाऊ शकता त्यामुळे त्या पदार्थाची पोषक तत्वं वाढतात.
- मखाने, मध आणि फळांचा मिश्रण करून खाऊ शकता यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
- मखान्यांमध्ये मीठ, काळी मिरी किंवा चाट मसाला घालून नाश्ता म्हणून खाऊ शकता यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.