Rose oil : गुलाब तेलाचा वापर करा; वृद्धत्वाला दूर ठेवा

गुलाबपाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच त्वचेवर गुलाबाचे तेल लावल्याने अनेक फायदे होतात. गुलाबपाणी एक उत्तम टोनर आहे. ते लावल्याने त्वचेवरील छिद्रे लहान होतात आणि त्वचा मुलायम दिसते. दुसरीकडे, गुलाबाच्या तेलाचा वृद्धत्वावर देखील प्रभावी परिणाम होतो.

Rose oil : गुलाब तेलाचा वापर करा; वृद्धत्वाला दूर ठेवा
अजय देशपांडे

|

Aug 17, 2022 | 2:19 PM

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर गुलाब तेलाचे काही थेंबच (rose oil) तुम्हाला परिणाम दाखवू शकतात. गुलाब तेल हे वृद्धत्वविरोधी (Anti aging) आहे, त्याचा वापर केल्याने तुमचे सौंदर्य वाढेल. गुलाबाचे तेल त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करते. गुलाब तेलाचे एक नाही तर, अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम राहतेच. त्याचबरोबर यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करतात. गुलाब हे त्याच्या सौंदर्यासाठी आणि सुगंधासाठी ओळखले जाते. तर, ते त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. गुलाब तेलाचे एक नाही तर असंख्य फायदे सांगता येतील. हे केवळ त्वचा तरुण ठेवत नाही, तर त्यामध्ये असलेले अँटिसेप्टिक गुणधर्म त्वचेचा पोत सुधारतात. त्याच वेळी, हे वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. गुलाबाच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट घटक देखील चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी (Less wrinkles on the face) करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या तेलाने दररोज मसाज केल्याने डोळ्यांखालील काळे वर्तूळ दूर होतात.

गुलाब तेलाचे फायदे

गुलाबाच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवतात आणि त्वचेची कांती नितळ करतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचण्यास प्रतिबंध करते आणि अशा प्रकारे त्वचा स्वच्छ दिसते. त्याच वेळी, त्याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्याच्या संपर्कात येणारी घाण आणि धूळ देखील दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेत चमक कायम राहते.

असे बनवा गुलाब तेल

बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत ज्यात गुलाबाचा अर्क वापरला जातो. तुमची इच्छा असल्यास, गुलाब तेल तुम्ही घरी तयार करू शकता. तर, गुलाबाचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला दहा गुलाबाच्या पाकळ्या, सोबत ऑलिव्ह ऑइल आणि एक कप पाणी लागेल. गुलाबाचे तेल बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या काढून त्या वेगळ्या करा. नंतर एका काचेच्या भांड्यात ऑलिव्ह ऑइल टाका. नंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि गरम पाण्यात तेलाने भरलेली कुपी ठेवा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी तेलाच्या पाकळ्या पिळून त्या वेगळ्या करा. गुलाब तेल तयार आहे. आता या तेलाचे चार ते पाच थेंब चेहऱ्यावर लावा. या तेलाचे दोन ते चार थेंब रोज चेहऱ्याला मसाज करा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करते.

त्वचेसाठी असा करा वापर

जर तुम्हाला गुलाबाच्या तेलाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसावा असे वाटत असेल तर, या तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांभोवती हलक्या हातांनी मसाज करा. असे केल्याने त्वचा पुन्हा घट्ट होऊ लागते. काळे वर्तुळेही निघून जातील. असे केल्याने चेहऱ्यात आश्चर्यकारक बदल आपण अनुभवाल कारण वयाचा प्रभाव सर्वप्रथम डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर दिसून येतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें