AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monkeypox : दिल्लीनंतर आता तेलंगणातही आढळला मंकीपॉक्सचा संशयीत रुग्ण; चाचणीचा अहवाल तपासणीसाठी पाठवला पुण्याला

दिल्लीचे प्रकरण ताजे असतानाच आता तेलंगणामध्ये (Telangana) देखील मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती नुकताच परदेशातून भारतात परतला आहे.

Monkeypox : दिल्लीनंतर आता तेलंगणातही आढळला मंकीपॉक्सचा संशयीत रुग्ण; चाचणीचा अहवाल तपासणीसाठी पाठवला पुण्याला
Image Credit source: social media
| Updated on: Jul 25, 2022 | 8:44 AM
Share

हैदराबाद :  भारतात देखील आता मंकीपॉक्सचा प्रसार होत असल्याचे पहायला मिळत आहे. काल दिल्लीमध्ये एका 31 वर्षीय रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा अहवाल हा मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आला त्या व्यक्तीच्या परदेश प्रवासाची कोणतीही नोंद नाही. मात्र तरी देखील त्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. दिल्लीचे प्रकरण ताजे असतानाच आता तेलंगणामध्ये (Telangana) देखील मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती नुकताच परदेशातून भारतात परतला आहे. प्रवासातून परतल्यानंतर हा व्यक्ती आजारी पडला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे की नाही? हे चाचणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या व्यक्तीच्या चाचणीचे अहवाल तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्था (NIV) कडे पाठवण्यात आले आहेत.

दिल्लीमध्ये आढळला रुग्ण

दरम्यान रविवारी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण कुठेही परदेशात गेला नव्हता तरी देखील तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचे वय 31 वर्ष असून, त्याच्यावर दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या व्यक्तीला सुरुवातीला ताप आला होता, त्यानंतर चेहऱ्यावर जखमा झाल्या त्यामुळे त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज तेलंगणामध्ये जो मंकीपॉक्सचा संशयीत रुग्ण आढळून आला आहे, तो परदेशातून भारतात परतला आहे. चाचणीचा अहवाल येईलपर्यंत या व्यक्तीला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

धोका वाढला

आता कुठेतरी कोरोनाचे संकट टळले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजरा पॉझिटिव्ह व्यक्ती अथवा प्राणी यांच्या संपर्कात आल्याने, तसेच पॉझिटिव्ह रक्त, शिंका, खोकला या माध्यमातून देखील पसरतो. व्यक्तीला आजाराची लागण झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांनंतर या आजाराची लक्षण दिसत असल्यामुळे प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?