Alcohol: ऐकावं ते नवलंच! या देशात पितात गरम वाईन, पण का? कारणही धक्कादायक
Gluhwein Culture: प्रत्येक देशात दारु पिण्याच्या काही रुढी आणि परंपरा आहेत. त्यातील काही अत्यंत विचित्र आणि धक्कादायक आहेत. आपल्याकडं वाईनचं चांगलं उत्पादन होतं. पण या देशात थंडी वाईन नाही तर गरम वाईन पिल्या जाते. त्यामागील कारणंही तसंच आश्चर्याचा धक्का देणारं आहे.

Hot Wine Serve in Germany: युरोपमधील अनेक देशात ख्रिसमसचा बाजार सजतो. नवीन वर्षांपर्यंत या बाजारात खरेदीदारांची गर्दी असते. ख्रिसमसचा बाजार हा नवीन वर्षासाठी सुद्धा पर्वणीच असते. जर्मनीत तर या बाजाराला अत्यंत महत्त्व असते. जर्मनीतूनच ही संकल्पना युरोपमध्ये पसरल्याचेही मानले जाते. केवळ खरेदी विक्रीच नाही तर खवय्यांसाठी इथं अनेक पदार्थांची रेलचेल असते. दुसरीकडे सर्वात मोठे आकर्षण हे ग्लुवाईनचे असते. ग्लुवाईन संस्कृती इथं खास मानल्या जाते. कारण ही जुनी परंपरा आहे. यामध्ये गरम वाईन प्यायला दिली जाते.
मल्ड वाईनची खास चव
तर ग्लुवाईन हा ख्रिसमस बाजारातील एक खास प्रकार आहे. थंडीच्या काळात हे खास पेय केवळ जर्मनीपुरता मर्यादित नाही. तर ते आता हळूहळू इतर देशातही पसरला आहे. ग्लुवाईनला मल्ड वाईन असं ही म्हटल्या जाते. जर्मनीच्या बाहेर याला गरम वाईन असं म्हटल्या जाते. केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये मल्ड याचा अर्थ मीठा आणि मसाले टाकून गरम केलेली वाईन असा होतो. ही वाईन जर्मनीत लोकप्रिय आहे. ही वाईन शरिरासाठी फायदेशीर मानल्या जाते.
वाईनला मसाल्यांचा स्वाद
वाईनम्ये मसाले टाकण्यात येतात. वाईनला मसाल्यांचा स्वाद येतो. या वाईनला ग्रीकमध्ये हिप्पोक्रास असे म्हणत. मसाल्यांचा फ्लेव्हरसाठी रेड वाईन अथवा व्हाईट व्हाईनमध्ये ही विविध गरम मसाल्यांचा वापर करण्यात येतो. लफब्रो विद्यापीठाच्या अहवालानुसार, बायबलमधील ‘सॉन्ग ऑफ सोलोमन’ नावाच्या कवितेत सुद्धा त्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये गरम वाईनचा उल्लेख असल्याचा आणि ही वाईन अंगुरांपासून खास पद्धतीने तयार केल्याचा उल्लेख आहे.
रेड वाईनासून तयार ग्लुवाईन ही सर्वात खास मानल्या जाते. या वाईनमध्ये साखर, मध, वा इतर गोड सीरप आणि मसाले टाकण्यात येतात. यामध्ये दालचिनी, लवंग, दगड फूल, जायफळ, जावित्री, अद्रक, काळे मिरे आणि इतर मसाल्यांचा वापर करण्यात येतो. संत्रे, लिंबू यासारखी फळांचा रस यामध्ये असतो. मसाल्याचा अर्क यामध्ये उतरतो. त्याचा स्वाद आणि वास या वाईन रंगत आणि चव वाढवतात. लफब्रो विद्यापीठातील इंग्रजी भाषेचे प्राध्यापकांनी इंग्रजी साहित्यात अनेक ठिकाणी या वाईनचा उल्लेख असल्याचे सांगतात. अनेक जुन्या साहित्यात या वाईनचा उल्लेख आहे. ब्रिटेनमध्ये मल्ड वाईन पोहण्यामागे रोमन असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ज्यांना दारुला शिवायचे नाही. त्यांच्यासाठी मसाल्यांचा आणि संत्र्याचा वापर करून अशाच प्रकारचे खास पेय तयार करण्यात येते.
