AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asthma: ‘अस्थमा’ च्या रुग्णांनो घ्या इझी श्वास , दम्यावरील प्रभावी उपचारांचा संशोधकांचा दावा! जाणून घ्या, काय आहे संशोधन

Asthma Research: दमा रुग्णांसाठी उपयोगी ठरेल असे संशोधन करण्यात आले आहे. संशोधकांनी लघवीची चाचणी करून दम्यावर उत्तम उपचार कसे करता येतील हे शोधून काढले आहे. या नवीन शोधामुळे दम्याच्या रुग्णांना श्वास घेणे सोपे होऊ शकते, संशोधकांनी दम्यावरील प्रभावी उपचारांचा दावा केला आहे.

Asthma: ‘अस्थमा’ च्या रुग्णांनो घ्या इझी श्वास , दम्यावरील प्रभावी उपचारांचा संशोधकांचा दावा! जाणून घ्या, काय आहे संशोधन
अस्थमा रुग्णांसाठी नवे संशोधन वरदानImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 05, 2022 | 6:25 PM
Share

दमा हा एक असा आजार आहे जो फुफ्फुसांवर बराच काळ परिणाम करतो. दमा हा फुफ्फुसाचा एक सामान्य आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.संशोधकांनी दम्यावरील प्रभावी उपचारांच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे जगभरातील 262 कोटीहून अधिक अस्थमा रुग्णांना (Asthma patients) श्वास घेणे सोपे होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. अभ्यासाचे नेतृत्व ECU च्या डॉ. स्टेसी रेन्के आणि स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे डॉ. क्रेग व्हीलॉक यांनी केले. संशोधकांच्या टीमला गंभीर दमा असलेल्या रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचे जैवरासायनिक (Biochemical) (मेटाबोलाइट) आढळून आले. हे लघवीच्या चाचणीद्वारे (By urine test) शोधले जाऊ शकते. फुफ्फुसातील जैवरासायनिक बदल रक्तात प्रवेश करतात आणि लघवीद्वारे उत्सर्जित होतात. म्हणजेच लघवीतील मेटाबोलाइटची उपस्थिती तपासून गंभीर दम्याच्या रुग्णांवर अचूक उपचार करता येतात.त्यांनी अभ्यासासाठी 11 देशांतील 600 सहभागींच्या लघवीची तपासणी केली. या वेळी, टीमने एक विशेष प्रकारचा मेटाबोलाइट शोधला, ज्याला कार्निटिन म्हणतात. तीव्र दम्यामध्ये त्याची उपस्थिती कमी होते. कार्निटाईन्स पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

दम्याच्या उपचारासाठी नवीन शोध

संशोधनाचे प्रमुख डॉ. रेनके म्हणाले की, अभ्यासाचे निष्कर्ष दम्यावरील उपचारांच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतील. फुफ्फुसातील जैवरासायनिक बदल रक्तात प्रवेश करतात आणि लघवीद्वारे उत्सर्जित होतात. म्हणजेच लघवीतील मेटाबोलाइटची उपस्थिती तपासून गंभीर दम्याच्या रुग्णांवर अचूक उपचार करता येतात.

काय आहे आजार

दमा हा एक असा आजार आहे जो फुफ्फुसांवर बराच काळ परिणाम करतो. दमा हा फुफ्फुसाचा एक सामान्य आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते आणि सामान्यतः बालपणापासून सुरू होतो. काही लोक, विशेषतः लहान मुले, हळूहळू दम्याच्या स्थितीतून बाहेर येऊ शकतात. परंतु बहुतेक लोकांसाठी हा आजीवन आजार आहे.

दम्याची लक्षणे

घरघर (श्वास घेताना शिट्टीचा आवाज) धाप लागणे छातीत घट्टपणा – जणू कोणीतरी दोरी बांधली आहे. खोकला दम्याच्या लक्षणांची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलते. ते येतात आणि जातात, परंतु काही लोकांमध्ये ते कायम असतात. अस्थमाच्या लक्षणांमुळे काही वेळेस खूप वाईट परिस्थिती निर्माण होते. याला अस्थमा अटॅक म्हणतात.

दमा होण्याची कारणे

दमा हा श्वसननलिका सुजल्याने, होतो, ज्याचे कार्य म्हणजे फुफ्फुसातून हवा बाहेर काढणे आणि आत घेणे. श्ससननलिका सुजस्याने, ती खूप संवेदनशील बनते, त्यामुळे ते तात्पुरते थोडेसे संकुचित होते. हे कधीही, किंवा ट्रिगरच्या संपर्कात आल्यानंतर होऊ शकते. कधीकधी ही नळी श्लेष्मामुळे ब्लॉक होऊ शकते.

दम्याची काही सामान्य कारणे

घरातील धुळ, प्राण्यांचे केस आणि परागकण यासारख्या ऍलर्जी निर्माण करणारे घटक इतर त्रासदायक, जसे की तीक्ष्ण सिगारेटचा धूर, गॅस आणि थंड हवा आणि वेगाने केलेला व्यायाम. या कारणामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो.

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं