‘कोरोना’ आणि ‘फ्लू’ ची लक्षणे कशी ओळखायची याबाबत संभ्रम आहे का.. जाणून घ्या, या दोन्ही संसर्गातील नेमका फरक!

डॉक्टर म्हणतात की, कोविड आणि सामान्य सर्दी हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत ज्यामुळे घसा खवखवणे, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही आजाराची लक्षणे सारखीच असल्याने, आपल्याला कोरोना झालाय की साधा फ्लू हे कसे ओळखावे जाणून घ्या, या दोन्ही आजारातील नेमका फरक.

‘कोरोना’ आणि ‘फ्लू’ ची लक्षणे कशी ओळखायची याबाबत संभ्रम आहे का.. जाणून घ्या, या दोन्ही संसर्गातील नेमका फरक!
‘कोरोना’ आणि ‘फ्लू’ ची लक्षणे कशी ओळखायची याबाबत संभ्रम आहे का.. जाणून घ्या, या दोन्ही संसर्गातील नेमका फरक! Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 12:57 PM

पावसाळा सुरू झाल्याने आणि हवामानातील बदलामुळे (Due to climate change) हवामानाशी संबंधित आजारही झपाट्याने वाढत आहेत. बहुतेक लोकसंख्येला हंगामी फ्लू आणि डेंग्यूपासून लेप्टोस्पायरोसिसपर्यंतच्या आजारांनी ग्रासले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांमध्ये कोविड-19 च्या लक्षणांसारखीच दिसणारी लक्षणे असतात. हे जाणून अनेक लोक संभ्रमात सापडले आहेत. तरीही दोन पूर्णपणे भिन्न रोग (different diseases) शरीरावर कसा परिणाम करतात आणि त्यांच्यात कोणते पैलू साम्य आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनी कांतरू यांनी सहमती दर्शवली की, रुग्णांमध्ये खूप गोंधळ आहे. ते म्हणतात, “केवळ हंगामी फ्लूमुळे अनेक रुग्ण ताप, खोकला आणि सर्दी हलक्यात घेत आहेत. परंतु मला वाटते की, सर्वात चांगला उपाय म्हणजे COVID-19 साठी चाचणी करणे कारण हंगामी फ्लू आणि कोविडची लक्षणे (Symptoms of covid) सारखीच आहेत.

कोविड-19 आणि पावसाळ्यातील आजारां मधील समानता

डॉ. कांतरू म्हणाले की, तो मौसमी फ्लू असो किंवा कोविड ‘दोन्ही अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि कॉमोरबिडीटीचे आजार आहेत, म्हणजेच एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दोन्ही आजार होण्याची शक्यता जास्त असते.’ संसर्ग, प्रभाव आणि तीव्रतेच्या बाबतीत कोविड-19 हा आजार पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. दरम्यान, दोन्ही लक्षणांच्या बाबतीत काही समानता आहेत.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्यातील आजारांसोबत अनेकदा उच्च ताप, थकवा आणि सांधे व स्नायू दुखणे हे कोविड-19 मध्ये देखील आढळते. कोविड आणि सामान्य सर्दी हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत ज्यामुळे घसा खवखवणे, खोकला, ताप, अंगदुखी, रक्ताच्या गुठळ्या आणि बरेच काही होऊ शकते.

फरक ओऴखणे खूप कठीण

सामान्य सर्दी आणि कोविड-19 मध्ये फरक करणे खूप कठीण आहे दोन्ही रोग श्वसनाच्या आरोग्याशी संबंधित आहेत हे लक्षात घेता, लक्षणे मोठ्या प्रमाणात सारखीच आहेत, ज्यामुळे त्यांना ओळखणे अधिक कठीण होते. दरम्यान, सर्दीची लक्षणे अचानक दिसतात आणि हळूहळू निघून जातात, तर कोविडची लक्षणे हळूहळू उद्भवतात आणि अनेक दिवस किंवा महिने टिकतात. तज्ञ सल्ला देतात की, कोणतीही लक्षणे आढळल्यास, स्वतःची चाचणी करून घ्या.

इतरांनाही होतो संसर्ग

डॉ. कांतरू म्हणाले की, कोविड-19 देखील क्लस्टरमध्ये येत असल्याने ओळखले जाऊ शकते. ‘म्हणून जर एखादी व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह असेल तर बहुतेक कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही लक्षणे दिसून येतील. BA.2.75 आणि BA.5 या अपडेट व्हर्जनमुळे, लोकांना अजूनही सौम्य संसर्ग होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.