Ayurveda Tips: थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणात; रोज असेच प्यावे पाणी!

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले आहे. तुमच्या चुकीच्या सवयींमुळेही तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला, संधिवात, थायरॉईस सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगीतलेल्या हेल्दी टिप्स, ज्यामुळे थायरॉईड संधिवात सारख्या 10 आजारांवर नियंत्रण ठेवता येते.

Ayurveda Tips:  थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणात; रोज असेच प्यावे पाणी!
Ayurveda Tips: थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणातImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 4:39 PM

प्रौढ मानवी शरीरात 60% पर्यंत पाणी असते. ज्यातून आपला मेंदू आणि हृदय, फुफ्फुसे, त्वचा, स्नायू, मूत्रपिंड, अगदी हाडांमध्येही पाणी (Water even in the bones) असते. अशा परिस्थितीत दररोज पुरेसे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे शरीरातील निर्जलीकरण टाळता येते. त्यामुळे, मूड चेंज, बद्धकोष्ठता, किडनी स्टोन यांसारख्या समस्या टाळण्याचे काम करते. शरीरात पाण्याची कमतरता लघवीच्या रंगावरून ओळखता येते. जर तुमच्या लघवीचा रंग स्वच्छ (Urine color clear) पाण्यासारखा नसेल, तर तुमच्या शरीरात पुरेसे पाणी नाही. पाण्यात कॅलरीज नसतात, त्यामुळे ते शरीराचे वजन नियंत्रित करण्यात आणि गोड चहा किंवा नियमित सोडा यांसारख्या कॅलरीयुक्त पेये बदलून कॅलरी कमी करण्यात मदत करू शकते. परंतु, पाणी पिण्याची योग्य पद्धत असते, योग्य पद्धतीने पाणी पिल्यास, शरीराला अनेक रोगांपासून दूर (Away from diseases) ठेवता येते.

पाणी पिण्याचे काय आहेत फायदे?

पाणी तुमच्या शरीराचे तापमान सामान्य ठेवते. यासह, संपूर्ण शरीराचे आरोग्य राखते, पाठीचा कणा आणि इतर संवेदनशील मांसपेशींचे संरक्षण करते, लघवी, घाम येणे आणि मलविसर्जनाद्वारे शरीरातील कचरा काढून टाकण्याचे कार्य फक्त पाण्याद्वारेच केले जाते.

आयुर्वेद तज्ज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेद तज्ञ डॉ. नितिका कोहलीने नुकतीच त्यांच्या इन्स्टा पोस्टवर आरोग्यदायी पद्धतीने पाणी पिण्याची माहिती शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे लाभदायक आहे का. असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर मी म्हणेन की, तांब्याचे पाणी त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. फक्त लक्षात ठेवा की, तांब्याचे भांडे शुद्ध धातूंचे बनले आहे व तितकेच स्वच्छ आहे. थायरॉईड, त्वचारोग, संधिवात यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अशा प्रकारे पाण्याचे सेवन करणे चांगले आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते.

हे सुद्धा वाचा

थायरॉईड आजारावर उपयोगी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तांब्याच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथींमध्ये बिघाड होतो. या प्रकरणात, तांबे पाणी थायरॉईड ग्रंथीची कार्यक्षमता संतुलित करते. तुम्हाला थायरॉइडची समस्या असल्यास, तांब्याच्या भांड्यात रोज पाणी पिणे तुमच्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.

संधीवात आणि सांधे दुखी कमी करते

तांब्याचे पाणी हाडांना मजबूत बनवून आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे संधिवाता साठी एक उत्कृष्ट उपचार करते. तांब्याचा दाहक-विरोधी प्रभाव संधिवात असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीची समस्याही कमी होते.

पचनास मदत करते

तांब्याचे पाणी प्रदूषक आणि हानिकारक जंतू काढून टाकते. यासह, ते पोटाची जळजळ कमी करते, आणि चयापचय वाढवते आणि पचन सुधारते.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.