Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातील दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू, नागरिकांचा संताप!

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्यामध्ये मोठ्याप्रमाणावर जलचर प्राणी राहत असल्याने या दूषित पाण्यामुळे नक्कीच त्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. तसेच लासलगांवसह सोळा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य (Health) धोक्यात येण्याची शक्यता आहे. घडलेल्या प्रकारावर धरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जातंय.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातील दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू, नागरिकांचा संताप!
Image Credit source: tv9
उमेश पारीक

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 29, 2022 | 9:14 AM

लासलगाव : निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर (Nandur Madhyameshwar) धरणामध्ये दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले असून या पाण्यामध्ये रासायनिकयुक्त पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजन (Oxygen) कमी झाल्याने मासे मृत झाल्याचा अंदाज वर्तवला जातोयं. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्यामध्ये मोठ्याप्रमाणावर जलचर प्राणी राहत असल्याने या दूषित पाण्यामुळे नक्कीच त्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. तसेच लासलगांवसह सोळा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य (Health) धोक्यात येण्याची शक्यता आहे. घडलेल्या प्रकारावर धरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जातंय.

मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 270 पेक्षा अधिक जातीचे पक्षी

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेले तसेच नव्याने रामसर दर्जा प्राप्त झालेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 270 पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांची दर्शन होते. चमचा, शरटी, पाणकाडी, बगळा ,पानकावळे, जांभळी ,पाणकोंबडी, वारकरी, राखी बगळा, रातबगळा, राज्यपक्षी हरियाल, पावश्या, घुबड, वेडा राघू, निलपंख, सुतार, तरंग, गडवाल, मलाई, थापड्या, हळदी-कुंकू असे पक्षी आढळून येतात.

हे सुद्धा वाचा

दूषित पाण्यामुळे शेकडो मासांच्या जीव गेला

नांदूर मधमेश्वर धरणामध्ये दूषित पाण्यामुळे शेकडो मासांच्या जीव गेला आहे. रासायनिकयुक्त पाणी हे धरण क्षेत्रात केस गेले असा प्रश्न आता निर्माण झालायं. रासायनयुक्त पाण्यामुळे मासांना ऑक्सिजन मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. लासलगांवसह सोळा गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. नागरिक हे पाणी सांडपाणी आणि पिण्यासाठी देखील वापरतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें