AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त मनुकाच नाही, त्याचं पाणी प्यायल्यानेही होतो भरपूर फायदा! वाचा कसं तयार करतात

आपण बऱ्याचदा या ड्रायफ्रूट्सच्या सर्व फायद्यांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी मनुक्याचे पाणी प्यायलंय का? जर तुम्हाला याचे फायदे माहित नसतील तर तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल.

फक्त मनुकाच नाही, त्याचं पाणी प्यायल्यानेही होतो भरपूर फायदा! वाचा कसं तयार करतात
Soak raisinsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 02, 2023 | 2:32 PM
Share

गोड मनुक्याची चव कोणाला आकर्षित करत नाही? आपण अनेकदा ते थेट खातो. मिठाईपासून पुलावांपर्यंत सगळ्यात मनुक्याचं वापर केला जातो. आपण बऱ्याचदा या ड्रायफ्रूट्सच्या सर्व फायद्यांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी मनुक्याचे पाणी प्यायलंय का? जर तुम्हाला याचे फायदे माहित नसतील तर तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल.

मनुका खाण्याचे फायदे

  • मनुकामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. बरेच आहारतज्ञ हे भिजवून खाण्याचा सल्ला देतात, मानसिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम आहार मानला जातो, तसेच वजन कमी करण्यास मदत होते.
  • मनुक्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हल्ली विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव खूप दिसून येत आहे, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. मनुक्याचे पाणी आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवते, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होते.
  • शरीरात असलेले विषारी घटक मर्यादेपेक्षा जास्त जमा झाले तर अनेक आजारांचा धोका वाढतो. जे लोक नियमितपणे मनुका पाणी पितात त्यांच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे यकृत निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.

मनुक्याचे पाणी कसे तयार करावे?

मनुक्याचे पाणी तयार करण्यासाठी एका कढईत एक ग्लास पाणी टाकून उकळावे. आता त्यात मनुका घालून रात्रभर भिजत ठेवायला ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी गाळून प्यावे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?