AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

clove and rock sugar benefits: निद्राशयाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल प्रभावशाली…

benefits of eating clove and rock sugar: बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तज्ञांच्या मते, खडीसाखर आणि लवंग खाल्ल्याने खोकला, श्वास आणि निद्रानाश यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदिक उपचार आजही प्रभावी आहेत.

clove and rock sugar benefits: निद्राशयाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल प्रभावशाली...
Kitchen SpicesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2025 | 11:03 PM

प्राचीन काळात जेव्हा लोकांना औषधांचे नावही माहित नव्हते, त्या काळात आपले पूर्वज अगदी गंभीर आजारांवरही घरगुती उपचार करत असायचे. आजकाल महागड्या रुग्णालये आणि औषधांमुळे लोकांची लूट होताना पाहायला मिळतेय, अशा परिस्थितीत आयुर्वेद ही एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या घटकांनी अनेक आजारांवर उपचार करू शकता. जसे की खोकल्याची समस्या किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असे अनेक पदार्थ आढळतात ज्यांच्या वापरामुळे तुमच्या शरीरातील गंभीर आजार देखील अगदी मुळापासून दूर होते. आयुवेदाचार्यांच्या मते, घरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे तुमचचा खोकल्याची समस्या दूर होते.

आयुर्वेद तज्ञ म्हणतात की, खडीसाखर आणि लवंग चोखल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. याबाबत सविस्तर माहिती देताना आयुर्वेदाचार्य म्हणतात की, जर घरात एखाद्या व्यक्तीला रात्री वारंवार खोकला येत असेल आणि कफ बाहेर पडत नसेल, तर अशा समस्येत ती व्यक्ती खूप अस्वस्थ होते. अनेकदा रात्री झोपल्यावर तुम्हाला खोकल्याची समस्या असेल तर झोप लागत नाही आणि छातीमध्ये दुखण्याच्या समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊयात स्वयंपाकघरातील कोणत्यापदार्थ खोकला पळून लावेल.

आयुर्वेदात असे म्हटले आहे की जर तुम्ही खडीसाखर आणि लवंग तोंडात ठेवून त्याचा रस चोखला तर तुम्हाला आराम मिळेल आणि कफाची समस्याही दूर होईल. याशिवाय, जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही लवंग आणि खडीसाखर तोंडात ठेवूनही चोखू शकता, जितका जास्त रस तुमच्या आत जाईल तितक्या लवकर तुमची समस्या दूर होईल. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला लवकरच आराम मिळेल. या लावंग आणि खडीसाखरेची आणखी एक खासियत म्हणजे जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर ही समस्या क्षणार्धात सुटते. घरगुती उपचारांवर आधारित हा आयुर्वेदिक उपाय सामान्य जीवनात खूप उपयुक्त ठरत आहे. पूर्वीच्या काळात लोक त्यांचे सर्व उपचार आयुर्वेदाद्वारेच करायचे, ज्याला तुम्ही आजीचे उपाय देखील म्हणू शकता.

खडीसाखरेचे आरोग्यदायी फायदे…

खडीसाखर अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ही नैसर्गिकरित्या गोड असल्याने ती शरीरात ऊर्जा वाढवते. तसेच, खडीसाखर पचन सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि खोकला-घसा दुखण्यासारख्या समस्यांवर आराम देण्यास मदत करते. खडीसाखर पचनक्रियेला मदत करते आणि अन्न लवकर पचायला मदत करते, ज्यामुळे अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या कमी होतात. खडीसाखरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक रेणू नष्ट करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. खडीसाखर नैसर्गिकरित्या गोड असल्यामुळे ती शरीराला त्वरित ऊर्जा पुरवते आणि थकवा कमी करते.

खडीसाखर वात, पित्त आणि कफ या त्रयगुणांचे संतुलन राखण्यास मदत करते, ज्यामुळे कफ आणि खोकल्याच्या समस्या कमी होऊ शकतात. खडीसाखर साखरेपेक्षा कमी कॅलरीज आणि चरबी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते. खडीसाखर घसा दुखणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या समस्यांवर आराम देते. खडीसाखर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते, ज्यामुळे अॅनिमिया कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर खडीसाखरेचे पाणी प्याल्याने दृष्टी सुधारते. खडीसाखर पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे पचन सुधारण्यास, तोंडातील दुर्गंधी दूर करण्यास, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच, लवंग वेदना कमी करते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. लवंग पचन सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाच्या समस्या कमी होतात. लवंगातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जंतू मारतात आणि तोंडाची दुर्गंधी दूर करतात. लवंगात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते. लवंगाचे दाहक-विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात, उदा. दाढदुखी, मासिक पाळीतील वेदना. अभ्यासांनुसार, लवंग रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.