AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pumkin Seeds Benefits: सकाळी रिकाम्यापोटी ‘या’ बिया खाल्ल्यामुळे आरोग्याला होतील अनेक फायदे…

Healthy Lifestyle: निरोगी राहण्यासाठी, तुमच्या आहारात भोपळ्याच्या बिया आणि काजूचा समाविष्ट करा. भोपळ्याच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यांचा वापर कसा करावा आणि ते शरीराला कोणते फायदे देतात? चला जाणून घेऊया

Pumkin Seeds Benefits: सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया खाल्ल्यामुळे आरोग्याला होतील अनेक फायदे...
| Edited By: | Updated on: Feb 26, 2025 | 4:26 PM
Share

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनशैली आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. लोक अनेकदा त्यांच्या आहारात काजू आणि बियांचा समावेश करतात, पण तुम्ही कधी भोपळ्याच्या बिया खाण्याच्या फायद्यांचा विचार केला आहे का? भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. त्यात प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला संपूर्ण पोषण प्रदान करतात.

संशोधनानुसार, भोपळ्याच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि त्यांचा आहारात समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे तुमचं पचन सुधारते, हाडे मजबूत होतात, हृदयाशी संबंधित समस्यांचा आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते ज्यामुळे संसर्गाचे आजार होत नाही. याशिवाय, भोपळ्याच्या बिया तुमचं वजन कमी करण्यास आणि त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. जर तुम्हालाही तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर आजपासूनच तुमच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करा.

भोपळ्याच्या बियांमधील पोषक घटक :

भोपळ्याच्या बियांना सुपरफूड मानले जाते कारण त्यात स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले प्रथिने सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. फायबर जे पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि शरीरामध्ये हेल्दी चरबी निर्माण करते. भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम हाडे मजबूत करते आणि स्नायूंचे कार्य सुधारते. भोपळ्याच्या बियांमधील झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्यांच्यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरात असलेल्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे वृद्धत्वाचे परिणाम कमी होतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्यावर नैसर्गिक चमक निर्माण करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1-2 चमचे भोपळ्याच्या बिया खा. भोपळ्याच्या बिया तुम्ही भाजून किंवा कच्चे खाऊ शकतात. तुम्ही ते स्मूदी, ओट्स, सॅलड किंवा दहीमध्ये मिसळून देखील खाऊ शकता. भोपळ्याच्या बिया चवीला चांगले आहेत आणि बहुतेक लोकांना ते खूप आवडतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे –

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट हलके राहते. भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. भापळ्याच्या बियांचे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. हाडे मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो. या बियांमध्ये असलेले झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

केस मजबूत आणि जाड होतात

भोपळ्याच्या बियांमुळे सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांना प्रतिबंध होतो आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी आणि फायबर भरपूर असतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात या बियांचा समावेश नक्कीच करा. या बियांमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्या त्वचा निरोगी बनवतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्याने केस मजबूत आणि जाड होतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?