Herbal Tea Benefits: घरच्या घरी ‘हे’ हर्बल टी ट्राय केल्यास Period Craps होतील दूर…
Herbal Tea for Menstrual Cycle: व्यस्त जीवनशैलीमुळे आणि ताणतणावामुळे तुम्हाला मसिक पाळी दरम्याण अनेक समस्या होऊ शकतात. मासिक पाळी दरम्याण होणाऱ्या पोटदुखी आणि अंगदुखीच्या समस्या उद्भवू लागतात. मासिक पाळी दरम्याण होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी काही विशेष घरगुती हर्बल चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

अनेक महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या आधी आणि त्यादरम्यान पोटदुखी सारख्या समस्या उद्भवतात. मासिक पाळीमुळे महिलांना हाडांमध्येही वेदना होऊ लागतात. एका संशोधनानुसार, साध्या पोषक आहाराच्या कमतरतेमुळे मासिक पाळी दरम्याण वेदना कमी होऊ शकतात. अनेक महिला या वेदना कमी करण्यासाठी स्वतःहून औषधे घेतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? मासिक पाळी दरम्याण औषध खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीमध्ये औषध खाल्ल्यामुळे तुमच्या पोटदुखीच्या समस्या वाढू शकतात. त्यासोबतच रक्तस्तराव कमी होते.
मासिक पाळी दरम्याण अनेक महिला घरगुती उपाय करतात. आयुर्वेदिक उपायांमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही. काही विशेष चहाचे सेवन केल्यामुळे तुमच्या मासिक पाळी दरम्याण होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीपासूव सुटका मिळवू शकते. मासिक पाळीमध्ये काही घरगुती हर्बल चहा ट्राय केल्यामुळे तुमच्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी कोणत्या हर्बल चहा फायदेशीर ठरेल.
आल्याचा चहा – आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. आल्याचा चहा आपल्या स्नायूंना आराम देतो. आल्याची चहा पिल्याने पोटफुगीच्या आणि पोटदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
दालचिनी चहा – दालचिनीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्म आढळतात. मासिक पाळीच्या दरम्यान होणारे पोटदुखी कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर मानली जाते. दालचिनीचा चहा प्यायल्याने तुमच्या पोटांच्या स्नायूंना आराम मिळतो.
हळदीचा चहा – हळदीमध्ये कर्फ्यूमिन आढळते ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हळदीचा चहा पिल्याने मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीपासून आराम मिळतो आणि स्नायूंचा त्रास कमी होतो. हळदीचा चहा शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित करण्यास मदत करतो.
बडीशेपचा चहा – बडीशेपचा चहा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास देखील मदत होते. बडीशेपच्या चहामध्ये फायटोएस्ट्रोजेन असते ज्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देण्यास आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते.
