AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्राप्रमाणे तुम्हीसुद्धा एग फ्रीझिंग करून पाहिजे तेव्हा बनू शकता आई ! काय असते ही प्रोसेस, जाणून घ्या

आईच्या सल्ल्यानुसार अभिनेत्री प्रियांका चोप्राने एग फ्रीजिंगचा पर्याय निवडला आणि त्यानंतर अनेक वर्षांनी तिने पती निक जोनाससोबत बाळाचे स्वागत केले. आता प्रियांका आणि निक एका गोंडस मुलीचे पालक आहेत.

प्रियांका चोप्राप्रमाणे तुम्हीसुद्धा एग फ्रीझिंग करून पाहिजे तेव्हा बनू शकता आई ! काय असते ही प्रोसेस, जाणून घ्या
| Updated on: Mar 31, 2023 | 12:24 PM
Share

नवी दिल्ली : आई बनणं, मातृत्वाचं सुख (motherhood) अनुभवणं हे बहुतांश स्त्रियांचं स्वप्न असतं. पण आजकाल लोकांची जीवनशैली (lifestyle) पूर्णपणे बदलली आहे. तरूण पिढीची प्राथमिकता हे त्यांचे करीअर आहे. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला त्यांचा जॉब, करीअर महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत लग्न, मूल हे दुय्यम ठरतं. अनेक महिलांना करीअरला (career)प्राथमिकता द्यायची असते, त्यामुळे तेव्हा त्यांना मातृत्वाचा निर्णय घ्यायचा नसतो आणि नंतर वय वाढल्यावर त्यांना आई बनण्यात अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नोकरदार महिलांना त्यांची अंडी गोठवून (egg freezing) ठेवण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून त्यांना नंतर आई बनण्याचा आनंद घेता येईल.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने सांगितले की, तिने वयाच्या तिसाव्या वर्षी तिच्या (स्त्रीरोगतज्ञ) आईच्या सल्ल्यानुसार एग फ्रीजिंगचा पर्याय निवडला होता आणि नंतर अनेक वर्षांनी तिने पती निकसोबत आपल्या बाळाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. आज प्रियांका आणि निक हे मालती मेरी या लेकीचे पालक आहेत.

‘ मी माझ्या तिशीतच एग्स फ्रीज केले होते आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मला करिअरमध्ये बरंच काही करायचं होतं म्हणून एग फ्रीज केल्याने मला स्वतंत्रपणाची भावना जाणवली. त्याचप्रमाणे मी तेव्हा अशा व्यक्तीला भेटले नव्हते, ज्याच्यासोबत मी माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकेन. त्यामुळे सर्व चिंतांना दूर ठेवून मी आईच्या सल्ल्यानुसार माझे एग फ्रीज केले’ , असं प्रियांका म्हणाली. प्रियांकाची आई स्वत: महिलांची डॉक्टर आहे.

आई होण्यात वय नाही येणार आड

ज्या स्त्रिया करीअरच्या धबाडग्यात किंवा कामाच्या दबावामुळे गर्भधारणा करू इच्छित नाहीत, त्यांनी बायोलॉजिकल क्लॉक लक्षात घेऊन नंतरच्या काळासाठी एग फ्रीजिंगचा पर्याय निवडावा. जेणेकरून वेळ आल्यावर त्यांना आई होण्याचा आनंद घेता येईल. एग फ्रीजिंगचे हे तंत्र लाखो महिलांसाठी वरदान ठरत आहे ज्यांना एक ठराविक वय उलटून गेल्यानंतर आई होण्याचा आनंद घेता येत नाही.

एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय ?

एग फ्रीजिंग किंवा अंडी गोठवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी महिलांची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. एग फ्रीजिंगमुळे गर्भधारणेचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, डॉक्टर महिलेची संपूर्ण तपासणी करतात. एका महिलेच्या शरीरात दर महिन्याला एक अंडे तयार होते. पण प्रत्येक महिन्यात तयार होणारं अंड हे फ्रीज करण्यायोग्य किंवा गोठवण्यास योग्य नसल्यामुळे कोणत्या महिन्याची अंडी जपून ठेवायची हे तपासण्यानंतर कळते.

जर अंड्याचे जतन करण्याचे प्रमाण कमी असेल तर नंतर त्या अंड्यातून गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी असते. म्हणूनच अंडी काढण्यापूर्वी महिलांवर उपचारही केले जाऊ शकतात. जेव्हा अंडी पूर्णपणे निरोगी असतात आणि गर्भधारणा करण्यास सक्षम असता, तेव्हा डॉक्टर अत्यंत काळजीपूर्वक अंडी काढून टाकतात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून त्यामुळे छोटी शस्त्रक्रिया करता येते. या अंतर्गत, अतिशय पातळ सुईने अंडी काढली जाते आणि ती सबझिरो तापमानात गोठवली अथवा फ्रीज केली जातात.

कधी होऊ शकते गर्भधारणा ?

एखादी महिलातिची अंडी 10-15 वर्षं फ्रीज करू शकते अथवा गोठवू शकते. तोपर्यंत अंडी अंडाशयात जशी होती तशाच स्थितीत राहतात. भविष्यात जेव्हा एखाद्या स्त्रीला आई व्हायची इच्छा असेल तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे त्या अंड्याचे फलित केले जाईल आणि ही फलित अंडी स्त्रीच्या शरीरात दाखल करण्यात येतील.

कोणत्या महिलांसाठी ठरते फायदेशीर ?

ज्या महिलांना सध्या गर्भधारणा अथवा प्रेग्नन्सी नको आहे, मात्र भविष्यात गर्भधारणेच्या आपल्या क्षमतेबद्दल खात्री हवी आहे, अशा महिला एग फ्रीजिंगचा सुरक्षित पर्याय निवडू शकतात. तसेच, ज्या महिलांना अनुवांशिक रोग, कॅन्सर, किंवा इतर संसर्गाशी संबंधित रोग किंवा ज्यांचे अवयव निकामी आहेत त्यांच्यासाठी एग फ्रीजिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कोणत्या वयात एग फ्रीजिंग केले पाहिजे ?

साधारणपणे महिलांचे गर्भधारणेचे वय 20 ते 30 दरम्यान मानले जाते. त्यानंतर त्यांची प्रजननक्षमता कमी होऊ लागते. मात्र याचा अर्थ असा नव्हे की 30 व्या वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकत नाहीत. पण महिलेच्या शरीरात काही गुंतागुंत निर्माण झाल्यास 30 व्या वर्षानंतर गरोदरपणात अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्या स्त्रियांना अंडी गोठवायची आहेत त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षाच्या आधी अंडी गोठवावीत. एग फ्रीजिंगचे परिणाम लक्षात घेऊन कोणतीही स्त्री या पर्यायाचा अवलंब करू शकते.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.