AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी केसांची काळजी घेताना ‘या’ चुका टाळा अन्यथा.., होतील गंभीर परिणाम

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. आजकल अनेकांना केसांची योग्य काळजी घेता येत नाही. केसांची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे केसगळती, केसांमध्ये कोंडा होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहारासोबत तुमच्या दैनंदिन आहारामध्ये काही सकारात्मक बदल करणे गरजेते आहे. चला तर जाणून घेऊया केसांची काळजी नमकं कशी घ्यावी आणि निरोगी केसांसाठी काय गोष्टी टाळल्या पाहिजे.

निरोगी केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा अन्यथा.., होतील गंभीर परिणाम
hair longImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 05, 2025 | 2:20 PM
Share

अनेकांनां लांब आणि घणदाट केस पाहिजेल असतात. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे केसांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. केसांची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. केसांची काळजी घेताना काही चुका केल्यामुळे तुम्हाला केसगळती, कोंडा अशा समस्या होतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी केसांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावणे अत्यंत गरजेचे असते. केसांना तेर लावल्यामुळे केसांमध्ये जटा होत नाहीत. केसांना तेल लावल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

वातावरणातील प्रदुषणामुळे केस फ्रिझी आणि ड्राय होऊ लागतात. त्यामुळे केसांची निगा राखणे गरजेचे असते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे गरजेचे असते. केसांना धुतल्यामुळे त्यांच्यातील धुळ आणि प्रदुषण काढून टाकण्यास मदत होते. केस ड्राय करताना हेआर ड्रायरचा वापर केल्यामुळे केसगळण्याच्या समस्या अधिक वाढतात. चला तर जाणून घेऊया निरोगी केसांसाठी केसांची काळजी कोणत्या पद्धतीनं घ्यावी.

केस धुतल्यानंतर अनेकांना केस विंचरण्याची सवय असते. पंरतु केस घुतल्यावर लगेच विंचरल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. केस धुतल्यानंतर कमकुवत होतात. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही ओल्या केसांना विंचरल्यामुळे तुमचे केसस तुटतात ज्यामुळे केसगळतीची समस्या वाढण्यास सुरुवात होते. अनेकजण दररोज केस धुतात परंतु जास्त प्रमाणात केस धुतल्यामुळे ते अधिक कमकुवत होतात आणि केसगळतीची समस्या वाढते. त्यासोबतच केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस अधिक फ्रिझी आणि ड्रास होऊ लागतात. त्यामुळे जस्त वेळा हेअर वॉश करू नये. हिवाळ्यामध्ये अनेकजण गरम पाण्याने अंगोळ करतात. परंतु गरम पाण्याने केस धुतल्यामुळे तुमच्या स्कॅल्पवर त्यांचा गंभार परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसगळतीची समस्या वढते. त्यामुळे गरम पाण्याने हेअर वॉश करू नये.

आजकर केस सरळ आणि कर्ल्स करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर केला जातो. परंतु, स्ट्रेटनर, कर्लर आणि ब्लो ड्रायरसारख्या हीटिंग टूल्सचा वापर केल्यामुळे तुमची केस कमकुवत आणि ड्राय होतात. यांच्या वापरामुळे केसगळतीची समस्या वाढते. अनेकजण तेल लावल्यनंतर केस घट्ट बांधतात. केसांना तेल लावल्यावर ते कमकवत होतात आणि घट्ट घट्ट बांधल्यामुळे केसगळतीची समस्या वाढते. लांब केसांच्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. निरोगी केसांसाठी तुमच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश करा. योग्य आणि पोषक आहारामुळे तुम्हाला केसगळतीच्या समस्या होत नाहीत.

निरोगी केसांसाठी ‘या’ टिप्स वापरा :

केसांना नियमित खोबरेल तलानी मसाज करा.

आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ धुवा.

एक ते दोन महिन्यांच्या गॅपने केस ट्रिम करा.

केसांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक शॅम्पू लावू नका.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.