देशात निर्माण होणार कंडोमची टंचाई ? कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं काय होणार ? आरोग्य मंत्रालय म्हणतं…

कंडोम खरेदी करणारी केंद्रीय कंपनी खरेदी करण्यात अपयशी ठरल्याने देशात कंडोमचा तुटवडा भासणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु, आरोग्य मंत्रालयाने हे सर्व अहवाल चुकीचे घोषित केले आहेत.

देशात निर्माण होणार कंडोमची टंचाई ? कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं काय होणार ? आरोग्य मंत्रालय म्हणतं...
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 2:07 PM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : भारतात येत्या काही काळात कंडोमचा तुटवडा भासणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्स करत आहेत. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS) वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर वाईट परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अहवालात असे म्हटले आहे की ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ज्यामध्ये कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणाऱ्या कंपनीचा समावेश आहे, त्यांनी सरकारला एक पत्र लिहीले आहे. CMSS कंडोम खरेदी करण्यात अयशस्वी झाले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने हे सर्व रिपोर्ट्स चुकीचे आणि भ्रम पसरवणारे असल्याचे म्हटले आहे.

सरकारकडे सध्या असलेला गर्भनिरोधकांचा साठा हा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याते आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी CMSS हे विविध औषधे आणि वैद्यकीय वस्तू खरेदी करते आणि त्याची निविदा प्रक्रिया आणि पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

सरकारकडे कंडोम्सचा पुरेसा साठा

राजधानी दिल्ली येथे असलेली CMSS, ही एक स्वायत्त संस्था आहे जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्रीय खरेदी एजन्सी, कंडोम खरेदी करते. CMSS ने मे 2023 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी 5.88 कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे.

सध्या, NACO (National Aids Control Organisation) M/S HLL Lifecare Limited कंपनीकडून 75% मोफत कंडोम पुरवठा होत आहे आणि 2023-24 सालासाठी उर्वरित 25% कंडोम नुकत्याच मिळालेल्या मान्यतेच्या आधारे CMSS पुरवणार आहे.

M/S HLL Lifecare Limited ने NACO साठी 6.6 कोटी कंडोम दिले आहेत. कंडोमची ही संख्या सध्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. तसेच, CMSS खरेदीला विलंब झाल्यामुळे कंडोमचा तुटवडा निर्माण झाला नाही. CMSS ने चालू आर्थिक वर्षात कंडोम खरेदीसाठी आधीच निविदा जारी केल्या आहेत आणि निविदांचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे असे मंत्रालयाने स्पष्टपण म्हटले आहे. निविदा प्रक्रिया आणि औषधे आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाची साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.