AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन

हिवाळ्यात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. या ऋतूत सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रक्तदाब नियंत्रित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेऊयात...

हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
BP
| Edited By: | Updated on: Nov 14, 2025 | 11:00 PM
Share

उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक देखील होऊ शकतो. हिवाळ्यात खाण्याच्या पद्धती बदलतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी थंडीच्या दिवसात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते निरोगी पदार्थ खावेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तर आजच्या लेखात तज्ञांनी सांगितले आहे की हिवाळा असो वा उन्हाळा, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, तुम्ही निश्चितपणे या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्याच्या दिवसात पालक भाजीचे सेवन करावे. कारण उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पालक खूप फायदेशीर आहे. यावर संशोधन देखील करण्यात आले आहे. पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे ज्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते, एक वनस्पती-आधारित संयुग जे उच्च रक्तदाब कमी करू शकते. तसेच पालक मध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील असतात, ज्यामुळ तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर ठरतात.

सुका मेवा

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर थंडीच्या या दिवसांमध्ये सुक्यामेव्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रक्तदाब कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संतुलित आहाराचा भाग म्हणून सुक्या मेवा आणि भोपळ्याच्या बिया, अळशी, चिया बियाणे, पिस्ता, अक्रोड, बदाम, या सर्व गोष्टींचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी आणि उच्च रक्तदा‍ब नियंत्रित राहण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

गाजराचे सेवन

थंडीच्या या हंगामात अनेक लोकांच्या आहारात गोड आणि पौष्टिक गाजरांचा समावेश हा असतोच, कारण तुम्ही जर नियमित गाजरांचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित करतात. 2023 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की दररोज सुमारे 100 ग्रॅम गाजर खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका 10% कमी होतो.

अंडीचे सेवन उच्च रक्तदाबा ठेवते नियंत्रित

अंडी केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसतात, तर संशोधनातून असेही दिसून आले आहे की ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहेत. तुम्ही आठवड्यातून पाच किंवा त्याहून अधिक अंडी खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची पातळी 2.5 मिमी एचजीने कमी होते. त्यामुळे अंडी खाणाऱ्यांमध्ये दीर्घकालीन उच्च रक्तदाब होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होती.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ