सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड

लोकांच्या मनात गैरसमज होता की, जर  लक्षणे सौम्य असतील तर त्यांना कोविड हा आजार होण्याची संभावना नाही,परंतु सर्वेक्षणातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.त्या साऱ्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत.

सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 3:38 PM

कोरोनाची लक्षणं (Coronavirus Symptoms) असणारे जे लोक आहेत त्यांची तपासणी करणे म्हणणेच या महामारी पासून संरक्षण करण्याचा सर्वात प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा व्हायरस संक्रमण असणाऱ्या लोकांची ओळख करून त्यांना वेगवेगळे करून या महामारी पासून संक्रमण (Covid Transmission) होण्यापासून वाचवू शकतो परंतु समस्या ही आहे की याचे प्रभावी असणे हे कोरोना टेस्टिंग (Coronavirus Testing) करणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. खरे तर तसे पाहायला गेले तर ज्या लोकांना कोविडचे लक्षण आहेत अशा लोकांनी स्वतः याची चाचणी करून घेतली आहे का? असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. हे अगदी स्पष्ट आहे की, अश्या टेस्ट न करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आपल्यापैकी अनेक जण सर्दी ,खोकला, ताप सारखी लक्षणे असून सुद्धा कोरोनाची टेस्ट त्यांना अजिबात करायची नसते.ब्रि​​टिश सरकार, किंग्स कॉलेज लंदन आणि शहरातील गेज आणि सेंट थॉमस हॉस्पिटल मध्ये एका समूहाने या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं समोर आलेले आहे व त्यामागे नेमके काय कारण आहे हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमध्ये प्रत्येक दिवशी 40 लाखांपेक्षा अधिक लोक अध्ययनाच्या ॲपच्या माध्यमातून त्यांना जी लक्षणे जाणवत आहेत त्या कोणत्याही लक्षणांची सूचना देतात आणि नुकतंच केल्या गेलेल्या कोरोना टेस्ट बद्दलच्या परिणामांची माहिती सुद्धा देत असतात आणि या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने ॲपवर नोंदवत असतात.

25 टक्के लोकांनी लक्षणे असून सुद्धा नाही केली टेस्ट!

महागाई काळाच्या दरम्यान अनेक लोकांसाठी टेस्ट करण्यासंबंधी वेगवेगळे मार्ग सुद्धा शोधले गेले परंतु ब्रिटनमध्ये एक नियम आतापर्यंत चालू आहे .जर तुम्हाला ब्रिटिश स्वास्थ एजन्सी एनएचएस (NHS) द्वारा यादी केलेले काही लक्षणं जे सांगितलेले covid-19 मुख्य तीन लक्षणे ( ताप,सर्दी,खोकला) सातत्याने असताना खोकला व दम लागणे, कोणत्याही प्रकारचा वास ओळखता न येणे यामधील एखादे लक्षण तुम्हाला आहे परंतु आणि तुम्हाला कोविड आहे हे जरी माहिती नसले तरी तुम्हाला पी सी आर टेस्ट करायला हवी.

किंग्स कॉलेज लंडन येथील संशोधक मार्क ग्राहम यांच्या मते अभ्यासा अंतर्गत जे काही तथ्य समोर आलेले आहेत याचे विश्लेषण करून मी आणि माझे सहकारी यांना एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आले आहे की अनेकांना लक्षणे जाणवून सुद्धा, त्यांनी काही लक्षणे अनुभवली सुद्धा आहेत परंतु त्यांच्यापैकी काही कमी जणांनी प्रत्यक्षपणे कोविड टेस्ट केलेली आहे.

अशा वेळी येणारे निष्कर्ष आश्चर्यजनक होते..

डिसेंबर 2020 मध्ये आपल्या सर्वांनी पाहिले की , ज्या व्यक्तींना तीन मुख्य लक्षण की एखादी लक्षणं होती त्यातील 25 टक्के लोकांनी त्वरित पीसीआर टेस्ट करण्या बद्दल ची माहिती दिली नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की या व्यक्तींना लक्षणे असून सुद्धा यांनी कोरोनाची टेस्ट अजिबात केली नाही आणि टेस्ट करण्याची सर्व मार्ग उपलब्ध असून सुद्धा या लोकांनी टेस्ट केली नाही.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेले तीन प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आम्ही युकेमध्ये 4000 लोकांचे सर्वेक्षण केले ज्यांना लक्षणं होती परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची चाचणी केली नव्हती त्याचबरोबर लक्षण असून सुद्धा या लोकांनी कोणत्याही प्रकारची चाचणी केली नाही अशावेळी आम्हाला काही तीन निष्कर्ष प्राप्त झाले.

1 . सर्वात पहिले अशा लोकांची परीक्षण करण्याची शक्यता कमी होती ज्यांच्यामध्ये तीन लक्षणांपैकी फक्त एकच लक्ष होते त्यांची लक्षणे फक्त एक दिवस पर्यंत राहतात तर यावरून असे समजले जाते की, लोकांमध्ये गैरसमज आहे. त्यांची लक्षणे सौम्य असतील तर त्यांना कोरोना होण्याची संभावना नाही असा सुद्धा अनेकांनी गैरसमज मनात करून घेतला होता.

2 त्याचबरोबर सर्वेक्षणामध्ये अशी सुद्धा माहिती समोर आली की 40% पेक्षा जास्‍त उत्तरदाता होते त्यांना तीनही लक्षणं येऊन गेली तरी त्यांना ओळखता आली नाही अश्या वेळी त्यांनी खरे तर टेस्ट करण्याची गरज होती. ज्येष्ठ नागरिकांमध्ये लक्षणे जाणून घेण्याची शक्यता खूपच कमी असते. 25 ते 34 वयोगटातील तरुण मंडळींना 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जे उत्तरदाता होते ते सहज रित्या ही लक्षणं ओळख शकले असते परंतु 75 वर्ष किंवा त्यांच्या पेक्षा जास्त वय असणारे फक्त 25 टक्के लोकच लक्षणं ओळखी शकले.

सोबतच जेव्हा लोकांना माहिती होते की त्यांना टेस्ट करणे गरजेचे आहे तेव्हा आम्हाला निष्कर्ष असा लागला की त्यांनी प्रत्यक्षात टेस्ट केली नाही असे लोक जे टेस्ट करणार होते परंतु त्यांनी ती टेस्ट केली नाही त्यांमागील लोकांनी सर्वसाधारण असे तीन कारण सांगितले.

“मला माहिती नव्हतं की टेस्ट करण्यासाठी कोठे जायचे असते.”

“मी कोणत्याही टेस्टिंग सेंटर वर पोहोचू शकलो नाही”

“मी टेस्ट करण्याची प्रयत्न केले परंतु करू शकलो नाही”

तर काय लोकांना टेस्ट करण्याची जाणीवच नव्हती?

एकंदरीत समोर आलेल्या निष्कर्षावरून एक गोष्ट समजते की माहितीचा अभाव यामुळे कोरोना चाचणी करण्यात एक मोठी बाधा निर्माण झाली होती तसेच लोकांना माहितीच नव्हतं की त्यांना झालेला आजार हा कोविड असू शकतो किंवा त्यांना या गोष्टीबद्दल जाणीवच नव्हती की त्यांना टेस्ट करायची आहे.जरी जाणीव झाली असली तरी सुद्धा ही टेस्ट करण्यास कुठे जायचे याबद्दल त्यांना माहिती नव्हते.

लक्षणे असणाऱ्या लोकांची ओळख करणे गरजेचे आहे.या संशोधनातून जे काही सिद्ध झाले ते आश्चर्य करणारे होते. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की या आजाराचा प्रचार व प्रसार थांबवायचे असेल तर या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर लोकांची टेस्ट झाली नाही तर कळत नकळत घर आणि काम करण्याच्या ठिकाणी या आजाराचा संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरू शकतो.

म्हणूनच संशोधनाच्या आधारे आम्हाला जे काही निष्कर्ष प्राप्त झालेल्या आहे त्यावरून लोकांना कोरोना बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे तसेच करण्यासाठी लोकांची संख्या वाढवण्यासाठी जनतेला माहिती देणे सुद्धा गरजेचे आहे त्याच बरोबर जर आपल्याला सौम्य लक्षणे असतील तर अशा वेळी चाचणी करणं गरजेचं आहे हे सुद्धा लोकांना पटवून देणं आवश्यक आहे.

 इतर बातम्या-

Nashik | ‘सावाना’चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

लाखो मुलांच्या हृदयाचा चक्काचूर, मौनी रॉयचं शुभमंगल सावधान, विवाहातला साऊथ इंडियन लूक बघाच!

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.