AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | ‘सावाना’चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

प्राचार्य विलास औरंगाबादकर यांची 2007 मध्ये सार्वजनि वाचनालय नाशिकच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली होती. ते 2008 ते 2010 या काळात वाचनालयाचे कार्याध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर 2012 पासून ते वाचनालयाच्या अध्यक्षपदी होते.

Nashik | 'सावाना'चे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा
प्रा. विलास औरंगाबादकर
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 27, 2022 | 3:19 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik)येथील सुप्रसिद्ध अशा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर (Principal Vilas Aurangabadkar) यांचे आज गुरुवारी, 27 जानेवारी रोजी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. औरंगाबादकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सावाना अर्थातच सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्षपद त्यांनी 10 वर्षे सांभाळले. या कार्यकालात त्यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. साहित्य, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे नावलौकिक होते. आज दुपारी 3 वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या नाट्यगृहाच्या आवारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. औरंगाबादकर यांच्या मागे एक भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महाविद्यालयांंचा कायापालट केला

प्राचार्य विलास औरंगाबादकर यांची 2007 मध्ये सार्वजनि वाचनालय नाशिकच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली होती. ते 2008 ते 2010 या काळात वाचनालयाचे कार्याध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर 2012 पासून ते वाचनालयाच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे फार्मसी आणि केटरिंग कॉलेजचे प्राचार्यपदी भूषविले. या दोन्ही महाविद्यालयात त्यांनी विविध उपक्रम राबवत त्यांचा कायापालट केला. नाशिकच्या चिन्मय मिशन संस्थचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

पालकमंत्र्यांची श्रद्धांजली

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी औरंगाबादकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. प्राचार्य विलास औरंगाबादकर यांनी सन 2008 पासून सावानाची विविध पदे भूषविली आहेत. सन 2012 पासून ते सावानाचे अध्यक्ष होते. मितभाषी, मृदुभाषी असे सरांचे व्यक्तिमत्व होते. चिन्मय मिशन, नाशिक, आयुर्वेद सेवा संघाच्या एथिकल कमिटीचे ही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. आपल्या कुशल कामामुळे महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये विविध महाविद्यालये त्यांनी नावारूपाला आणले. त्यांना आदर्श प्राचार्य, आदर्श प्रशासन अधिकारी व मुंबईचा समाजश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या काळात सार्वजनिक वाचनालयाने अनेक नवोपक्रम राबविले आणि वाचनालयाचे सांस्कृतिक कार्य पुढे नेले. त्यांच्या निधनाने सार्वजनिक वाचनालय व शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, औरंगाबादकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय औरंगाबादकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल