Health : तुम्हालाही आहे Diabetes ? जेवल्यानंतर करा ‘ही’ एक गोष्ट, कायमची मिटेल कटकट!

डायबिटीस असलेल्यांना योग्य ती पथ्य पाळावी लागतात अन्यथा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि अन्य आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळेत औषधं घेऊन पथ्यं पाळणं गरजेचं आहे.

Health : तुम्हालाही आहे Diabetes ? जेवल्यानंतर करा 'ही' एक गोष्ट, कायमची मिटेल कटकट!
DiabetesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 10:47 PM

मुंबई : सध्याच्या काळात डायबिटीसचे पेशंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एकदा डायबिटीस झाला की आयुष्यभर लोकांचा पाठलाग काही सोडत नाहीत. मोठे वैज्ञानिकही यावर ठोस असा इलाज शोधू शकलेले नाहीयेत. त्यामुळे डायबिटीस असलेल्यांना योग्य ती पथ्य पाळावी लागतात अन्यथा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि अन्य आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळेत औषधं घेऊन पथ्यं पाळणं गरजेचं आहे.

डायबिटीस असलेल्या लोकांनी जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर डायबिटीस असलेल्यांनी 10 ते 15 मिनिटे चाललं पाहिजे कारण चालल्यामुळे शरीरात चरबी निर्माण होत नाही आणि लठ्ठपणा टळतो. सोबतच अनेक आजारांपासून संरक्षण होतं. तसंच रात्री जेवणानंतर 2 ते 3 तासांनी झोपा त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील.

कधीही उपाशी राहू नका डायबिटीस असलेल्यांनी सतत काहीना काही खात राहीलं पाहीजे. जर तुम्हाला तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर कधीही उपाशी राहू नका. काही तासांचा गॅप ठेवत काहीना काही पदार्थ खाल्ले पाहिजेत. तसंच तुम्ही तुमच्या आहारात फळे, ड्रायफ्रूट्स, पालेभाज्या अशा हेल्थी पदार्थांचा समावेश केला पाहीजे.

व्यायाम करा डायबिटीस असलेल्या लोकांनी फक्त जेवण केल्यानंतर चालणं एवढंच पुरेसं नाहीये. अशा लोकांनी सकाळी उठल्यावर व्यायाम, योगासनं केली पाहिजेत. यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि अन्य आजारांपासूनही बचाव होतो.

Disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही घरगुती उपाय करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.