AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहाशिवाय दिवस जात नाही मग तर हे वाचाच! चहा पिण्याचे 5 तोटे

काही लोक आळशीपणामुळे एकदा चहा तयार करतात आणि पुन्हा पुन्हा गरम करून पितात. यामुळे चहा विषारी बनतो. चहा पुन्हा पुन्हा उकळून पिऊ नये याने आरोग्याचे नुकसान होते. पुन्हा पुन्हा उकळून त्यात विषारी केमिकल्स तयार होतात.

चहाशिवाय दिवस जात नाही मग तर हे वाचाच! चहा पिण्याचे 5 तोटे
tea loversImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 27, 2023 | 7:42 PM
Share

मुंबई: चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. अनेक ठिकाणी या पेयाचं सेवन केलं जातं. चहाचे अनेक प्रकार सुद्धा आहेत. चहाचे फॅन्स चहा घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही. अनेक लोकांना तर कामात सुद्धा काही सुचत नाही. “वेळेला चहा हवा, चहाला मात्र वेळ नसते” असंही ब्रीदवाक्य चहा प्रेमींनी बनवलंय. पण तुम्हाला चहा प्यायचे तोटे माहित आहेत का? चहा प्यायचे फायदे सुद्धा आहेत आणि नुकसान आहे. आज आपण बघणार आहोत चहा प्यायचे तोटे! काय आहेत तोटे? बघुयात…

1. कॅफिनची सवय

दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपल्याला चहामध्ये असणाऱ्या कॅफिनची सवय लागते. काही लोकांना तर याचं व्यसन लागतं म्हणून त्यांना चहा नाही मिळाला तर त्यांच्याकडून काम होत नाही, ते गडबडतात. असे अनेक लोकं तुम्ही आजूबाजूला देखील पाहिले असतील. वेळेवर चहा न मिळाल्यास अस्वस्थता आणि डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. यालाच म्हणतात कॅफिनची सवय लागणे ज्याचा परिणाम न्यूरॉन्सवर होतो.

2. पोट खराब होणे

अनेक जण आपल्याला सल्ला देतात की चहा कधीच रिकाम्या पोटी पिऊ नये. आपल्यापैकी खूप लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय असते ज्याला आपण बेड टी म्हणतो. बेड टी ही पद्धत फॅन्सी दिसत असली तरी ती आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. चहा उग्र असतो, उठल्या उठल्या आपलं पहिलं पेय पाणी असावं. मग काहीतरी खाऊन चहा घ्यावा. उपाशी पोटी चहा घेतला की पॉट खराब होते.

3. मधुमेह

चहा प्यायल्याने मधुमेह होण्याची शक्यता असते. चहामध्ये आपण साखर टाकतो. साखर खाल्ली की शरीरातसुद्धा साखरेचं प्रमाण वाढतं याने मधुमेह होतो. मधुमेहावर उपचार नाहीत पण मधुमेह नियंत्रित करता येतो. त्यामुळे शक्य तितका चहा प्यायचा टाळा. बहुतेक डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना साखरेचा चहा न पिण्याचा सल्ला देतात.

4. लठ्ठपणा

लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनलीय. बऱ्याच लोकांचं हेच ध्येय असतं, लठ्ठपणा कमी करणे! चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा तुम्हाला जर कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण असुद्या.

5. हृदयाच्या आरोग्यावर होणारे परिणाम

आपण काय खातो, काय पितो यावर आपलं आरोग्य असतं. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर चहा टाळायलाच हवा. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजच्या आहारातून काही गोष्टी वगळल्या पाहिजेत, त्यापैकीच एक म्हणजे चहा. यामध्ये असे काही घटक आढळतात जे हृदयासाठी धोकादायक असतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.