AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breast Cancer Symptoms: स्तन किंवा काखेत गाठ दिसतेय? नका करु दुर्लक्ष, असू शकते कॅन्सरची सुरवात, लक्षणं आणि उपचार घ्या जाणून

Breast Cancer Symptoms: स्तन किंवा काखेत गाठ दिसतेय? 'ही' लक्षणं दिसतायेत बिलकूल करु नका दुर्लक्ष, भारतात महिलांमध्ये वाढतंय कॅन्सरचं प्रमाण, लक्षणं आणि उपचार घ्या जाणून

Breast Cancer Symptoms: स्तन किंवा काखेत गाठ दिसतेय? नका करु दुर्लक्ष, असू शकते कॅन्सरची सुरवात, लक्षणं आणि उपचार घ्या जाणून
फाईल फोटो
| Updated on: Oct 15, 2025 | 1:23 PM
Share

Breast Cancer Symptoms: भारतात महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजच्या स्त्रीरोग विभागातील एका डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर वेगाने पसरत आहे. तर या कॅन्सरच्या गाठीकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला या गाठीमध्ये कोणत्याच वेदना होत नाही, किंवा गाठ आहे असं देखील कळत नाही.. पण याकडू चुकूनही दुर्लक्ष करु नका. एक छोटी चूक मोठ्या संकटाला आमंत्रण देत असते… हे कधीच विसरु नका.

डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर वेगाने पसरत आहे. त्याबद्दल जाणून घेणं आणि ते ओळखणं खूप महत्वाचं आहे. जर लवकर निदान झालं तर पुढे होणारे वाईट परिणाम थांबवता येतात. याची काही लक्षणं आहे, जी ओळखल्यानंतर योग्य उपचार लवकर होऊ शकतात. तुमच्या स्तनात किंवा काखेत गाठ असल्यास दुर्लक्ष करू नका.

आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग विभागातील निष्णात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या स्तन किंवा काखेत गाठ असेल तर, त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका. शिवाय स्तन लालसर दिसत असेल तरी दुर्लक्ष करु नका… काही लक्षणं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या…

एवढंच नाही तर, स्तनाचा आकार बदलत असेल तर, हलक्यात घेऊ नका… वेळेत उपचार घ्या आणि मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ नका… डॉक्टरांनी स्पष्ट केले की, महिलांसाठी स्तनाचा कॅन्सर रोखण्यासाठी एक चाचणी उपलब्ध आहे, जी त्यांनी वेळोवेळी करून घेतली पाहिजे.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, एक्सरे आणि एमआरआय झाल्यानंतर देखील कॅन्सरचं निदान होतं. तपासात गाठ असल्याचं लक्षात आल्यानंतर बायोप्सी केली जाते. बायोप्सीमध्ये गाठ साधी आहे की कर्करोगाची आहे… याबद्दल माहिती होतं… जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यानंतर मोठा आजार सुरुवातीलाच थांबवता येतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, निरोगी आणि आरोग्यास लाभदायक पदार्थ खाल्ले पाहिजे. डॉक्टरांनी जंक फूड आणि पॅकेज्ड फूड टाळण्याचा सल्ला दिला…

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.