या मुस्लिम देशात कमावलेले 1 लाख भारतात आल्यावर होतात पाचपट, फायदा जाणून उंचावतील भुवया; भारतापासून किती लांब हा देश?
तुम्हाला 1 लाखाचे 5 लाख करायचेत..., या मुस्लिम देशातून येताच तुमचे लाख रुपये होतील 5 लाख, फायदा जाणून जाणून उंचावतील भुवया... असंख्य भारतीय नोकरीसाठी परदेशात असतात. पण या देशातील करेंसीमुळे होईल फायदा.

भारतातील असंख्य लोक परदेशात नोकरी, व्यवसाय करण्यासाठी जातात. तर असंख्या लोक फिरण्यासाठी परदेशात जातात. अनेकांना परदेशात फिरण्याची आवड असते. पण एक देश असा आहे जे भारतीयांचं आवडचं पर्यटन स्थळ आहे. या देशाचं नाव आहे मालदीव… मालदीव हे भारतीय पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय आणि लक्झरी प्रवास स्थळ आहे. दरवर्षी हजारो भारतीय सुट्ट्या, हनिमून आणि समुद्रकिनाऱ्यावरील विश्रांतीसाठी या देशात येतात. पण फार कमी लोकांच्या मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे भारतातील रुपयाची किंमत मालदीव येथे किती असेल? तर जाणून घेऊ भारत आणि मालदीवच्या चलन मूल्यातील फरक किती आहे.
मालदीव येथील अधिकृत चलनाचं नाव मालदीवियन रूफिया (Maldivian Rufiyaa) असं आहे. ज्याचा शॉर्ट फॉर्म MVR असा आहे. हे नाव संस्कृत शब्द रुप्यामधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ चांदी असा होतो. मालदीवच्या रुफियावर मालदीव मॉनेटरी अथॉरिटी (Maldives Monetary Authority – MMA) चं नियंत्रण आहे, जी देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि चलन पुरवठा, विनिमय दर आणि आर्थिक स्थिरता यावर देखरेख करते.
भारतायच्या रुपयाची किंमत भारतात किती आहे?
व्हाइस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, 1 मालदीवियन रूफियाची किंमत भारतातील करेंसीच्या तुलनेत 5 लाख 77 रुपये आहे. याचा अर्थ मालदीवमध्ये जाऊन कोणता भरतीय जर 1 लाख रुपये कमावत असेल तर, भारतात परतल्यांनंतर 1 लाख रुपयांचे 5 लाख 77 हजार रुपये झालेले असतील… तर भारतातील 1 रुपया मालदीव येथे फक्त 17 पैसे आहेत. यानुसार, जर एखादा भारतीय 1 लाख रुपये घेऊन मालदीवला भेट देण्यासाठी गेला तर तिथे पोहोचल्यानंतर त्याची किंमत फक्त 17 हजार 329 मालदीवियन रुफिया इतकी होईल.
मालदीवच्या करेंसीचं वैशिष्ट्य आणि डिझाइन
मालदीवच्या करेंसीचं केवळ आर्थिक महत्त्व नाही तर, कला आणि संस्कृतीचं देखील प्रतीक आहे. मालदीव हे हिंदी महासागराच्या मध्यभागी वसलेलं एक बेट राष्ट्र असल्याने, नोटा आणि नाण्यांमध्ये सागरी जीवन, पारंपारिक मासेमारी आणि मालदीवची सांस्कृतिक ओळख दर्शविली आहे. म्हणूनच, मालदीवच्या चलनात मासे, विविध प्रतिमा, जलक्रीडा आणि नौकानयन यासारख्या समुद्राशी संबंधित थीम आहेत.
