AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdev Baba yoga : करा रामदेव बाबांनी सांगितलेली ही 5 योगासनं आणि मिळवा गर्भाशयाच्या वेदनांपासून आराम

रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार भुजंगासन, मकरासन, मरजासियासन, अर्धमत्स्येन्द्रासन आणि प्राणायाम ही पाच योगासनं अशी आहेत, ज्यामुळे तुमच्या मान आणि पाठीच्या कण्याचे स्नायू मजबूत होतात, अनेक आजारातून तुमची सुटका होते.

Ramdev Baba yoga : करा रामदेव बाबांनी सांगितलेली ही 5 योगासनं आणि मिळवा गर्भाशयाच्या वेदनांपासून आराम
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2025 | 10:04 PM
Share

सध्या जवळपास सर्वांमध्येच एक कॉमन समस्या जाणवते ती म्हणजे पाठदुखी, खांदेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास. हा त्रास वाढण्यास सर्वात जास्त कारणीभूत आहे ती म्हणजे बैठी जीवनशैली, ऑफिसमध्ये कामासाठी तासंतास बसणे, लॅपटॉप, मोबाईलचा अधिक वापर, मान वाकवून काम करणं या सर्व कारणांमुळे तुम्हाला पाठदुखी, खांदेदुखी या सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही जर मोबाईल किंवा लॅपटॉपवर मान वाकवून अधिक काळ काम करत असाल तर तुम्हाला गर्भाशयाच्या स्पॉन्डिलायटिसचा धोका देखील वाढतो. तणाव पूर्ण जीवनशौली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा धोका अनेक पटीनं वाढू शकतो. यामध्ये पाठीच्या वराच्या भागात वेदना, यासोबतच हाताला, पायाला मुंग्या येणे या सारख्या समस्या उद्भवतात. यासाठी रामदेव बाबा यांनी काही योगासन सांगितली आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही या समस्या दूर करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार भुजंगासन, मकरासन, मरजासियासन, अर्धमत्स्येन्द्रासन आणि प्राणायाम ही पाच योगासनं अशी आहेत, ज्यामुळे तुमच्या मान आणि पाठीच्या कण्याचे स्नायू मजबूत होतात, स्नायूमध्ये लवकचिकता येते, तसेच त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत होते. हळूहळू या समस्या तुमच्या शरीरातून कमी होतात. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनाचे फायदे.

भुजंगासन – भुजंगासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो, मानेचे स्नायू ताणले जातात,रक्ताभिसरण सुधारते, तसेच गर्भाशयाच्या वेदना कमी होतात.

मकरासन – शरीराला आराम मिळतो, खांदा आणि मानेच्या दुखण्यातून सुटका होते. शरीर दुखत असेल तर त्यामध्ये आराम मिळतो.

मरजारियासन – गर्भाशयाच्या वेदना कमी होतात, तसेच पाठीचा कणा लवकचीक बनतो.

अर्धमत्स्येन्द्रासन – शरीरामध्ये लवचिकता निर्माण होते, मानेच्या दुखण्यापासून आराम मिळतो. गर्भाशयाच्या वेदना दूर होतात.

प्राणायम- प्राणायममुळे तुमच्या मांसपेशीला चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ताण तणाव कमी होतो, असे अनेक फायदे या योगासनाचे आहेत. यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.